पंतप्रधान मोदी कुणाच्या गळ्यात टाकणार मंत्रीपदाची माळ आणि कुणाला मिळणार डच्चू, राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी नारायण राणे यांचे मंत्रीपद जाणार असल्याचे बोलले होते, त्यामुळे राणे यांच्या मंत्रिपदाबाबत काही निर्णय होतो का ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

पंतप्रधान मोदी कुणाच्या गळ्यात टाकणार मंत्रीपदाची माळ आणि कुणाला मिळणार डच्चू, राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 9:33 AM

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पंतरप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात फेरबदल होतील अशी चर्चा आहे. त्यामध्ये शिंदे गटाला दोन मंत्रीपदे दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार अशीही चर्चा जोर धरू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 31 जानेवारीच्या पूर्वीच केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल होणार आहे. त्या अगोदर नवी दिल्लीतच भाजपा कार्यकारिणीची बैठक 16 आणि 17 जानेवारीला बैठक होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यामध्ये शिंदे गटाला दोन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह कुणाच्या गळ्यात माळ टाकणार आणि कुणाला डच्चू देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तार जुलै 2021 ला झाला होता. त्यामध्ये 20 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. अनेक मोठ्या मंत्र्यांना मोदी आणि शाह यांनी डच्चू दिला होता.

मंत्रिमंडळाचा कारभार पाहून नरेंद्र मोदी यांनी अनेकांना मोठी जबाबदारीही दिली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती.

हे सुद्धा वाचा

भागवत कराड, कपिल पाटील, नारायण राणे, डॉ. भारती पवार या चार जणांना मंत्रीपदे देण्यात आली होती, त्यावेळी 43 जणांना शपथ देण्यात आली होती, त्यामध्ये 11 महिलांचा समावेश होता.

नरेंद्र मोदी हे त्यांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ज्यांची नावे देण्यात आली होती त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचीच शिफारस असल्याचं बोललं जात होतं.

दरम्यान आता नव्या मंत्रीमंडळात कुणाला संधी मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार अशी चर्चा असतांना शिंदे गटाला दोन मंत्रीपदे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यातच काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी नारायण राणे यांचे मंत्रीपद जाणार असल्याचे बोलले होते, त्यामुळे राणे यांच्या मंत्रिपदाबाबत काही निर्णय होतो का ? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....