मंदिर किंवा आरक्षण नाही, तर हे आहेत मतदारांचे 10 प्रमुख मुद्दे
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मंदिर-मस्जिदपासून सवर्ण आरक्षणापर्यंतचे अनेक मुद्दे गाजत आहेत. अशावेळी मतदारांसाठी नेमके कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत? हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. याच प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संस्थेने देशभरात एक सर्वेक्षण केले आहे. एडीआरच्या सर्वेक्षणानुसार चांगल्या रोजगाराच्या संधी हा मुद्दा मतदारांच्या प्राधान्यक्रमात सर्वात वरती आहे. विशेष म्हणजे याच […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मंदिर-मस्जिदपासून सवर्ण आरक्षणापर्यंतचे अनेक मुद्दे गाजत आहेत. अशावेळी मतदारांसाठी नेमके कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत? हे जाणून घेणे अत्यावश्यक आहे. याच प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी ‘असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) या संस्थेने देशभरात एक सर्वेक्षण केले आहे.
एडीआरच्या सर्वेक्षणानुसार चांगल्या रोजगाराच्या संधी हा मुद्दा मतदारांच्या प्राधान्यक्रमात सर्वात वरती आहे. विशेष म्हणजे याच सर्वेक्षणानुसार रोजगाराच्याच मुद्द्यावर केंद्र सरकारची कामगिरी सरासरीपेक्षाही वाईट राहिली आहे.
एडीआरने संबंधित सर्वेक्षण 2018 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात घेतला होता. 534 लोकसभा जागांवर झालेल्या या सर्वेक्षणात जवळजवळ 2.73 लाख मतदारांनी सहभाग घेतला होता.
हे आहेत जनतेचे प्रमुख 10 मुद्दे
- चांगल्या रोजगाराच्या संधी (प्राधान्य – 46.86%)
- चांगली रुग्णालये /प्राथमिक आरोग्य केंद्रे (प्राधान्य – 34.60%)
- पिण्याचे पाणी (प्राधान्य – 30.50%)
- चांगले रस्ते (प्राधान्य – 28.34%)
- चांगली सार्वजनिक वाहतूक सेवा (प्राधान्य – 27.35%)
- शेतीसाठी पाण्याची उपलब्धता (प्राधान्य – 26.40%)
- शेतीसाठी कर्जाची उपलब्धता (प्राधान्य – 25.62%)
- शेतीमालाला हमीभाव (प्राधान्य – 25.41%)
- वीज/खते यांच्यावर अनुदान (प्राधान्य – 25.06%)
- चांगली कायदा सुव्यवस्था (प्राधान्य – 23.95%)
सर्वाधिक महत्त्वाच्या प्राधान्यक्रमावरील मुद्द्यांवर सरकारची कामगिरी
एडीआरच्या या सर्वेक्षणानुसार, जनतेच्या प्राधान्यक्रमात सर्वात वर असलेल्या मुद्द्यांवर मोदी सरकारची कामगिरी सरासरीपेक्षाही कमी झाली आहे. या सर्वेक्षणात मुल्यांकनाची मोजणी 5 गुणांमध्ये करण्यात आली आहे. तसेच सरासरी गुण 3 ठेवण्यात आले आहेत. या मुद्द्यांवर सरकारला जनतेने 5 पैकी दिलेले गुण खालीलप्रमाणे,
- चांगल्या रोजगाराच्या संधी (2.15 गुण)
- चांगली रुग्णालये /प्राथमिक आरोग्य केंद्रे (2.35 गुण)
- पिण्याचे पाणी (2.52 गुण)
- चांगले रस्ते (2.41 गुण)
- चांगली सार्वजनिक वाहतूक सेवा (2.58 गुण)
- शेतीसाठी पाण्याची उपलब्धता (2.18 गुण)
- शेतीसाठी कर्जाची उपलब्धता (2.15 गुण)
- शेतीमालाला हमीभाव (2.23 गुण)
- वीज/खते यांच्यावर अनुदान (2.06 गुण)
- चांगली कायदा सुव्यवस्था (2.26 गुण)