देशाला नवा कृषीमंत्री मिळणार, मोदींनी यावेळी ‘हे’ शिलेदार बदलले
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. देशभरात भाजप आणि एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची अनेकांना उत्सुकता होती. यानुसार मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात 57 मंत्री सहभागी झालेत. यात काही मंत्र्यांना नवीन जबाबदारी देण्यात येणार आहे. तर काहींना मात्र डच्चू मिळला आहे. मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात यापुढे हे […]
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. देशभरात भाजप आणि एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार याची अनेकांना उत्सुकता होती. यानुसार मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात 57 मंत्री सहभागी झालेत. यात काही मंत्र्यांना नवीन जबाबदारी देण्यात येणार आहे. तर काहींना मात्र डच्चू मिळला आहे.
मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात यापुढे हे चेहरे दिसणार नाहीत
- अरुण जेटली
अरुण जेटली हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. 2014 च्या मोदींचे सरकार स्थापन झाल्यानंतर अरुण जेटली यांची अर्थमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. जेटली यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात कायदा मंत्री आणि जलवाहतूक मंत्रीपद सांभाळलं आहे. मात्र नव्या मंत्रीमंडाळात प्रकृती अस्वास्थामुळे मला कोणतीही जबाबदारी नको, असे सांगत त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे यापुढे ते मोदींच्या मंत्रीमंडळात दिसणार नाही.
- सुषमा स्वराज
1973 साली सुषमा स्वराज यांनी सुप्रीम कोर्टात वकील म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली. विद्यार्थी चळवळीमध्येही त्या सक्रिय होत्या. दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री होण्याचा मानही सुषमा स्वराज यांनी मिळवला आहे. अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळातही त्या मंत्री होत्या. 2014 साली मध्य प्रदेशातील विदिशामधून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर सुषमा स्वराज यांची परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. प्रकृती अस्वास्थामुळे त्या यंदाची निवडणूक लढल्या नव्हत्या. मात्र त्यांनी यंदाच्या मंत्रीमंडळात कोणतंही स्थान देण्यात आलेलं नाही.
- सुरेश प्रभू
सुरेश प्रभू यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या काळात उद्योग मंत्री, पर्यावरण आणि वनमंत्री, खते आणि रसायनमंत्री, ऊर्जा मंत्री, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रममंत्री यांसारख्या विविध मंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. त्यानंतर 2014 मोदींच्या मंत्रीमंडळात त्यांची रेल्वे मंत्रीपदी वर्णी लागली होती.
- एम. जे. अकबर
एम. जे. अकबर हे ज्येष्ठ पत्रकार आहे. 2014 लोकसभा निवडणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यावेळी त्यांना मंत्रीमंडळात स्थान देत परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. राजीव गांधींचे निकटवर्तीय अशीही एम.जे.अकबर यांची ओळख आहे. पत्रकार प्रिया रमानी यांनी #MeToo या मोहीमेद्वारे एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.
- मनेका गांधी
मनेका गांधी यांनी 2014 साली महिला आणि बालकल्याण मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली होती. मात्र नव्या मंत्रिमंडळात त्यांना डच्चू देण्यात आला आहे.
- राधामोहन सिंह
राधामोहन सिंह हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहे. 2014 साली भाजपच्या कार्यकाळात त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री म्हणून कामकाज पाहिले आहे. मात्र यंदाच्या मंत्रिमंडळात त्यांना कोणतंही स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे देशाला नवा कृषिमंत्री मिळण्याची शक्यता आहे.
- सुभाष भामरे
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे यांनी धुळे मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेत. यावेळी त्यांना पुन्हा एकदा राज्यमंत्रीपदी वर्णी लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र यंदाच्या मंत्रिमंडळात त्यांना वगळण्यात आलं आहे. 2014 मोदींच्या मंत्रीमंडळात सुभाष भामरेंना सरंक्षण मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
- महेश शर्मा
महेश शर्मा हे भाजपचे नेते आहेत. उत्तरप्रदेशातील गौतम बुद्ध नगर या लोकसभा मतदारसंघातून त्यांनी 2014 साली निवडणूक लढली होती. 2014 मोदींच्या मंत्रीमंडळात त्यांची राज्याचे सांस्कृतिक आणि पर्यटन आणि नागरी उड्डयन मंत्रीपदी वर्णी लागली होती. मात्र नव्या मंत्रीमंडळात त्यांना डच्चू देण्यात आला आहे.
- मनोज सिन्हा
मनोज सिन्हा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2014 मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ ग्रहण केली होती. मनोज सिन्हा सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र नव्या मंत्रीमंडळात मनोज सिन्हा यांना वगळण्यात आलं आहे
- हंसराज अहिर
हंसराज अहिर हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेत. त्यांनी आतापर्यंत केंद्र सरकारच्या रेल्वे, टेलिफोन, सिंचाई अशाअनेक समित्यांवर काम केले आहे. सध्या ते कोळसा आणिपोलाद मंत्रालयाच्या समित्यांचे सदस्य असून रसायन आणि खते या खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र नव्या मंत्रीमंडळात हंसराज अहिर यांना वगळण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या