शिंदे गट, शिवसेनेतील ‘हे’ दोन नेते एकाच विमानातून दसरा मेळाव्यासाठी रवाना

आज मुंबईत शिवसेना आणि शिंदे गटाचा मेळावा पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचं लक्ष या दोन मेळाव्यांकडे लागले आहे.

शिंदे गट, शिवसेनेतील 'हे' दोन नेते एकाच विमानातून दसरा मेळाव्यासाठी रवाना
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 12:15 PM

मुंबई : आज मुंबईत (Mumbai) शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटाचा मेळावा पार पडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचं लक्ष या दोन मेळाव्यांकडे लागले आहे. यंदाचा दसरा मेळावा दोन्ही गटाकडून प्रतिष्ठेचा बनवण्यात आला आहे. दोन्ही गटातील नेत्यांनी दसरा मेळाव्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. एकोंमेकांवर घणाघाती टीका सुरूच आहे. दसरा मेळाव्याला रवाना होण्यापूर्वी शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी शिवसेना आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तर दुसरीकडे अंबादास दानवे यांनी देखील शिंदे गटावर निशाणा साधला होता. मात्र त्यानंतर हे दोन्ही नेते एकाच विमानातून मुंबईला रवाना झाले आहेत.

भुमरे, दानवेंचा एकाच विमानाने प्रवास

अंबादास दानवे आणि संदीपान भुमरे हे एकाच विमानाने दसरा मेळाव्यासाठी मुंबईला रवाना झाल्याचं पहायला मिळत आहे. त्यापूर्वी या दोन्ही नेत्यांनी एकोंमेकांवर घणाघाती टीका केली होती. मात्र त्यानंतर एकाच विमानाने प्रवास केला.

काय म्हटलं भुमरे यांनी?

संदीपान भुमरे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंकडे आता फक्त गद्दार आणि नमक हराम हे दोनच शद्ब शिल्लक असल्याचं भुमरे यांनी म्हटलं होतं.  आमच्या विरोधात भुंकण्यासाठी अंबादास दानवेंना पद दिल्याची टीकाही भुमरे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

अंबादास दानवेंचा शिंदे गटाला टोला

तर दुसरीकडे अंबादास दानवे यांनी देखील दसरा मेळाव्यावरून शिंदे गटावर घाणाघाती प्रहार केला आहे. शिंदे गटाचा मेळावा म्हणजे मोदींच्या ताटाखालचे मांजर असल्याची टीका त्यांनी केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.