Gulabrao Patil: त्यांनी वर्षा सोडलं, सगळं सोडलं पण शरद पवारांना काही सोडत नाहीत, गुलाबराव पाटलांचं पहिल्यांदाच थेट उत्तर
बंडखोर आमदारांची गुवाहाटीत बैठक झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली असून बंडखोर आमदारांनी आपलं मत या बैठकीत मांडलं. यादरम्यान, शिवसेनेचे बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेला टोला लगावत नाराजी व्यक्त केलीय.
मुंबई : त्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांनी आम्हाला 52 आमदारांनाही सोडलं, पण ते काही शरद पवारांना सोडायला तयारी नाहीत, अशी नाराजी शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी गुवाहीतील बैठकीत व्यक्त करत टोला लगावलाय. यावेळी बैठकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह सर्व बंडखोर आमदार उपस्थित होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेत केलेल्या संघर्षाविषयी देखील सांगितलं. जेलमध्ये गेल्याची आठवण आणि 1992च्या दंगलीची आठवण देखील त्यांनी करून दिली. दरम्यान, राज्यात चाललेला सत्तासंघर्षाच्या मुद्द्यावर गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय. पहिल्यांदा त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे.
गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणालेत?
बंडखोर आमदारांची गुवाहाटीत बैठक झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली असून बंडखोर आमदारांनी आपलं मत या बैठकीत मांडलं. यादरम्यान, शिवसेनेचे बंडखोर मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेला टोला लगावत नाराजी व्यक्त केलीय. यावेळी त्यांनी शरद पवार यांचाही उल्लेख केला. गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘त्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांनी आम्हाला 52 आमदारांनाही सोडलं, पण ते काही शरद पवारांना सोडायला तयारी नाहीत,’ अशा प्रकारची नाराजी गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदाच बोलून दाखवली आहे.
संजय राऊतांनी डिवचंल होतं
यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोरांना डिवचलं होतं. ते म्हणाले होते की, ‘गुलाबराव पाटील आणि संदिपान भुमरे यांच्यावर टीका करताना पुढे ते म्हणाले, की गुलाबराव पाटील आणि संदिपान भुमरे यांच्यासारखे कातडे वाघाचे आणि काळीज उंदराचे असे आम्ही नाही. आमचे काळीजही वाघाचे आहे. गुलाबराव पाटील मोठमोठ्या बाता मारत होता, मी सच्चा शिवसैनिक आहे, मला कॅबिनेट मंत्री केले. मग आता का पळाला ढुंगणाला पाय लावून, असा हल्लाबोल त्यांनी केला. हे महाभारतातील संजयचे वक्तव्य आहे, ज्याने तीस वर्ष बाळासाहेबांच्या पायाशी बसून काम केले आहे. माझा शब्द कधी खोटा ठरत नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, गुलाबराव पाटल्यांच्या वक्तव्यावर आता शिवसेनेकडून यावर काय पलटवार येतो, ते पाहणं महत्वाचं ठरेल.
महाराष्ट्र राज्य विधानसभा | सत्तेचं गणित |
---|---|
विधानसभेचे एकूण सदस्य | 288 |
दिवंगत सदस्य | 01 |
कारगृहात सदस्य | 02 |
सध्याची सदस्य संख्या | 285 |
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार | 39 |
आता सभागृहाची सदस्य संख्या | 285 |
बहुमताचा आकडा | 143 |
भाजपचं संख्याबळ | भाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172 |
मविआचं संख्याबळ | शिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111 |
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ? | भाजप (106)+ अपक्ष (27) = 133 |