प्रतापगडाच्या पायथ्याशी सापडलेली तिसरी कबर कुणाची?, संभाजी ब्रिगेडने कुणाचं नाव घेतलं?; वाद पेटणार?

या ठिकाणी उरूस देखील भरवला जात होता. या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध करायला सुरुवात केल्यानंतरच वाद वाढू नये या साठी 2006 मध्ये हे या कबरीचा भाग सातारा पोलिसांनी ताब्यात घेतला होता.

प्रतापगडाच्या पायथ्याशी सापडलेली तिसरी कबर कुणाची?, संभाजी ब्रिगेडने कुणाचं नाव घेतलं?; वाद पेटणार?
प्रतापगडाच्या पायथ्याशी सापडलेली तिसरी कबर कुणाची?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 1:27 PM

पुणे: प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण हटवण्यात आलं आहे. हे अतिक्रमण हटवत असताना अफझल खानाच्या कबरीजवळ आणखी तीन कबरी सापडल्या आहेत. त्यातील एक कबर अफझल खानाच्या सेवेकऱ्याची तर दुसरी अफझल खानाच्या सैन्यातील सरदार सय्यद बंडाची असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, तिसरी कबर कुणाची? असा सवाल केला जात आहे. ही तिसरी कबर कुणाची? याबाबतचं स्पष्टीकरण पुरातत्त्व विभागाकडेही नाही. तसेच अफझल खानाची कबर ताब्यात असलेल्या ट्रस्टकडेही नाही. मात्र, संभाजी ब्रिगेडने या कबरबाबत नवा दावा केल्याने वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अफझल खानाच्या कबरी भोवती असणारं अतिक्रमण पाडण्यात आलं. अतिक्रमणात पाडण्यात आलेल्या एका खोलीत एक कबर सापडली आहे. ही कबर शिवकालीन नसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी या कबरीबाबत नवा दावा केला आहे.

हे सुद्धा वाचा

प्रतापगडावर सापडलेली तिसरी कबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी’चीच आहे…! छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला, तेव्हा त्याचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी त्या ठिकाणी उपस्थित होता. त्याने शिवाजी महाराजांवर वार केला होता. कदाचित त्याच कृष्णाजी भास्कर कुलकर्णीची ती तिसरी कबर असावी, असा दावा संतोष शिंदे यांनी केला आहे.

ही कबर कुणाची आहे, याचा शोध घेतला पाहिजे. राज्य सरकारने त्याचा शोध घ्यावा, असं सांगतानाच छत्रपतींच्या शौर्याचा इतिहास जपला पाहिजेय हा सांस्कृतिक दहशतवाद मुक्तीचा इतिहास आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्षी सांगणाऱ्या प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला अफजलखानाच्या कबरीलगतचे अनधिकृत बांधकाम प्रशासनाने हटवले.

हे अतिक्रमण हटवल्या नंतर या ठिकाणी अफजल खान, सय्यद बंडा सोबत अजून दोन कबरी या ठिकाणी आढळून आल्या आहेत. या कबरी नेमक्या कुणाच्या आहेत या बाबत मात्र कोणालाच माहिती नाही.

किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असणाऱ्या अफजल खान कबरीच्या आजूबाजूला असलेले अतिक्रमण सातारा जिल्हा प्रशासनाने मोठा फौज फाटा नेहून पाडले. तब्बल 22 तास हे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू होती. हे अतिक्रमण काढल्यानंतर अजून 2 कबरी या ठिकाणी असल्याचे दिसून आले आहे.

अफजल खान आणि सय्यद बंडा यांचा कबरी शेजारी एक छोटी कबर सापडली आहेत. ती त्या ठिकाणी सेवा देणाऱ्या सेवेकरी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

तर अतिक्रमणात पाडण्यात आलेल्या एका खोलीत एक कबर सापडली आहे. ही कबर काही वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही कबर शिवकालीन नाही, पण मग ही कबर नेमकी आहे तरी कोणाची? ही कबर कधी बांधण्यात आली यांची माहिती प्रशासन घेते आहे.

हजरत महमंद अफजल खान मेमोरियल सोसायटी ट्रस्टने देखील या बाबत पुढे येवून कोणतीही माहिती दिलेली नाही. या कबरीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उदात्तीकरण करण्यात आले होते. दोन मोठ्या खोल्या या ठिकाणी बांधण्यात आल्या होत्या.

या ठिकाणी उरूस देखील भरवला जात होता. या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध करायला सुरुवात केल्यानंतरच वाद वाढू नये या साठी 2006 मध्ये हे या कबरीचा भाग सातारा पोलिसांनी ताब्यात घेतला होता. त्यामुळे नव्याने ही सापडलेली ही कबर 2006 पूर्वी बांधण्यात आली आहे, असं दिसतंय.

सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला या कबरी च्या आजूबाजूला असलेले जे अतिक्रमण काढले आहे, त्याचा अहवाल मागितला आहे. हा अहवाल देते वेळी प्रशासनाला या दोन नव्याने सापडलेलया कबरीबाबत सुद्धा माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.