Sanjay Raut: हा तर बालिशपणा, एकनाथ शिंदे अन् बंडखोर गटाच्या टीकेवर संजय राऊतांचं उत्तर, ‘ते काय आहेत मला माहित…’
शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटावर टीकास्त्र सोडलंय. यावेळी त्यांनी म्हटंल की, मी बोलतो आणि आदित्य ठाकरे बोलतात म्हणून आम्ही येणार नाही, हा केवळ बालिशपणा आहे, असं संजय राऊत म्हणले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादात आता भाजपच्याही (BJP) हलचाली सुरू आहेत. भाजपने राज्यपालांकडे महाविकास आघाडी सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली आहे. यामुळे राज्यपालांनी देखील मुख्यमंत्र्यांना उद्याच बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मविआ अडचणीत आलंय. यात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटावर टीकास्त्र सोडलंय. यावेळी त्यांनी म्हटंल की, मी बोलतो आणि आदित्य ठाकरे बोलतात म्हणून आम्ही येणार नाही, हा केवळ बालिशपणा आहे, असं संजय राऊत म्हणले आहेत. तर पुन्हा एकदा बंडखोरांना मुंबईत येण्याची मागणी केलीय.
‘…हा बालिशपणा’
शिवसेना नेते संजय राऊत बंडखोरांवर बोलताना म्हणाले की, ‘मी बोलतो आदित्य ठाकरे बोलतात म्हणून आम्ही येणार नाही, हा केवळ बालिशपणा आहे. सध्या जी परिस्थिती त्यावर मार्गदर्शन करणं हे आमचं काम आहे. त्यात तुमच्या छातीत कळ येण्याची गरज नाही. कोणत्या कारणांनी तुम्ही पळताय सगळं खोटं आहे. तुम्ही मुंबई या मग बघू,’ असंही राऊत यावेळी म्हणालेत.
मविआ कोर्टात जाणार?
39 आमदारांनी बंडखोरी केल्यानं शिवसेनेचं संख्याबळी कमी झालं असून त्यापैकी 16 आमदारांवर पक्षानं अपात्रतेची कारवाई सुरु केली आहे. यासंदर्भातील खटला सुप्रीम कोर्टात सुरु आहे. आमदार अपात्रतेसंबंधी याचिकेचा निर्णय लागेपर्यंत बहुमत चाचणी अर्थात फ्लोअर टेस्ट घेऊ नये, अशी मागणी मविआतर्फे करण्यात आली होती. मात्र कोर्टानं ती अमान्य करत, बहुमत चाचणीत काही पेचप्रचंग उद्भवल्यास तुम्ही कोर्टात दाद मागू शकता, असंही सांगण्यात येतंय.
राज्यपालांकडून पत्रं
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. उद्या 30 जून रोजीच बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे.
फ्लोअर टेस्टला
एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही उद्या फ्लोअर टेस्टला सामोरे जाणार आहोत. मुंबईत येणार आहोत. आमच्याकडे बहुमत आहे. त्यांच्याकडे बहुमत आकडा नाहीये, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
1 जुलै रोजीच नवं सरकार?
दरम्यान, 30 जून रोजी फ्लोअर टेस्ट झाल्यानंतर 1 जुलै रोजीच नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यासाठीच्या हालचाली भाजपकडून सुरू केल्या असल्याचं सांगितलं जात आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभा | सत्तेचं गणित |
---|---|
विधानसभेचे एकूण सदस्य | 288 |
दिवंगत सदस्य | 01 |
कारगृहात सदस्य | 02 |
सध्याची सदस्य संख्या | 285 |
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार | 39 |
आता सभागृहाची सदस्य संख्या | 285 |
बहुमताचा आकडा | 143 |
भाजपचं संख्याबळ | भाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172 |
मविआचं संख्याबळ | शिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111 |
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ? | भाजप (106)+ अपक्ष (27) = 133 |