BJP : बारामती मतदार संघात भाजप मंत्र्यांचे असे हे स्वागत, बॅनरमधून साधला उद्देश
राहुल ढवळे प्रतिनीधी इंदापूर : बहुचर्चित असलेला केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांच्या बारामती मतदार संघातील दौऱ्याला कालपासून सुरवात झाली आहे. पवारांच्या बालेकिल्ल्यात सितारमण ह्या पक्ष (BJP Party) संघटन आणि मजबुतीकरण यासाठी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्व आहे. मात्र, या मतदार संघातली राष्ट्रवादीच्या (Rashtrawadi) पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थमंत्री यांच्या स्वागताचे बॅनर लावले […]
राहुल ढवळे प्रतिनीधी इंदापूर : बहुचर्चित असलेला केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांच्या बारामती मतदार संघातील दौऱ्याला कालपासून सुरवात झाली आहे. पवारांच्या बालेकिल्ल्यात सितारमण ह्या पक्ष (BJP Party) संघटन आणि मजबुतीकरण यासाठी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्व आहे. मात्र, या मतदार संघातली राष्ट्रवादीच्या (Rashtrawadi) पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थमंत्री यांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. पण स्वागताबरोबर वाढती महागाई आणि शासनाच्या धोरणावरुन सरकारला टोला लगावला आहे. हा मतदार संघ खा. सुप्रिया सुळे यांचा असून आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने अर्थमंत्री थेट बारामतीमध्ये दाखल झाल्याने वेगळ्याच अंदाजामध्ये त्यांचे स्वागत केले जात आहे.
इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निर्मला सितारमण यांचे स्वागताचे बॅनर लावले असले तरी, वाढती महागाई आणि इंधनावरील दरवाढ यावर उपासात्मक टीका केली गेली आहे. बॅनल लावले ते देखील टीकेसाठी अशी अवस्था झाली आहे.
केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण ह्या बारामतीमध्ये दाखल होताच, आपण कुण्या परिवारावर टीका करण्यासाठी आलो नाहीतर पक्ष संघटन आणि मजबुतीकरण या मुद्द्यावर ठाम आहे. त्यामुळे त्यांनी पक्षीय कार्यक्रमावर भर दिला आहे.
इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या ठिकाणी येत आहेत, याच अगोदर इंदापूर तालुका राष्ट्रवादीने निमगाव केतकी या गावात सितारामण यांच्या स्वागताचे बॅनर लावल्याने एकच आश्चर्य व्यक्त होत आहे. हे बॅनर स्वागताच्या अनुषंगाने नाहीतर भाजप बोचरी टीका करण्याच्या उद्देशाने लावण्यात आले आहेत.
राष्ट्रवादीच्या बॅनरमधून वाढती महागाई, इंधनाचे दर हे कसे दिवसेंदिवस वाढत आहेत, त्याअनुषंगानेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निमगाव केतकी या गावामध्ये स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत.
भाजप नेत्याचा दौरा अन् राष्ट्रवादीची बॅनरबाजी हा विषय चांगलाच चर्चेत आलेला आहे. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथेच हे बॅनर लटकवण्यात आले होते. बॅनर इंदापूर तालुक्यात सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.