Pravin Darekar : कर्मानेच पक्षाची वाताहात झाली, दरेकरांचा ठाकरेंना आत्मचिंतन करण्याचा सल्ला

हर घर तिरंगाच्या माध्यमातून एक प्रकारे देशभक्तीची लाट निर्माण होत आहे. या उत्सवाला शनिवारपासूनच सुरवात होत आहे. येथून पुढे तीन दिवस विविध कार्यक्रओम राहणार आहे. एक वेगळा उत्साह चैतन्यमय वातावरण देशात निर्माण झाले आहे. ही खऱ्या अर्थाने देशभक्तीची लाट आहे.

Pravin Darekar : कर्मानेच पक्षाची वाताहात झाली, दरेकरांचा ठाकरेंना आत्मचिंतन करण्याचा सल्ला
शिवसेना पक्षप्रमुख आणि भाजप नेते प्रवीण दरेकर
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 10:01 PM

मुंबई :  (Shivsena Party) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्मिकच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत शिवसैनिकांशी संवाद साधला मात्र, या दरम्यान त्यांनी विरोधकांवर केलेल्या टीकेला आता प्रतिउत्तर दिले जात आहे. (Pravin Darekar) प्रवीण दरेकर यांनी तर पक्षाच्या वाताहतीला उद्धव ठाकरे यांनाच जबाबदार धरले आहे. पक्षाची ही अवस्था होण्यासाठी दुसरा-तिसरा कोणी जाबाबदार नसून जो तो आपल्या कर्मानेच संपतो असे म्हणत (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 52 पैकी 40 आमदार सोडून गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आत्मचिंतन करणे गरजेचे होते. पण हे दुसऱ्यांना दोष देत टोमणे मारत असल्याची टीका दरेकरांनी केली आहे. शिवाय सरकारला शुभेच्छा तर सोडाच पण सुरवातीलाच अपशकुन करु नका असेही सांगितले आहे.

खाते वाटपाचं दुखणं, पण चिंता नसावी

मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आता खातेवाटप कधी असा सवाल उपस्थित केला जात आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन पाच दिवस उलटले तरी नेमका कारभार कोणता कुणाकडे हेच समजसले नाही म्हणत शिंदे सरकारवर सामना मधून टीका करण्यात आली होती. याला उत्तर देताना हे सरकार जनतेसाठी तत्पर आहे. मुख्यमंत्री गावोगावी जाऊन नुकसानीचा आढावा घेत आहेत तर उपमुख्यमंत्री देखील दौरे करीत आहेत. त्यामुळे सर्वकाही सुरळीत होईल चिंता नसावी असा सल्ला दरेकरांनी दिला आहे. शिवाय खातेवाटपही लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

देशात देशभक्तीची लाट

हर घर तिरंगाच्या माध्यमातून एक प्रकारे देशभक्तीची लाट निर्माण होत आहे. या उत्सवाला शनिवारपासूनच सुरवात होत आहे. येथून पुढे तीन दिवस विविध कार्यक्रओम राहणार आहे. एक वेगळा उत्साह चैतन्यमय वातावरण देशात निर्माण झाले आहे. ही खऱ्या अर्थाने देशभक्तीची लाट आहे. याबद्दल अभिमान असणे गरजेचे होते पण पक्षाची झालेली वाताहात आणि सध्याची स्थिती यावरुन त्यांनी मनोगत व्यक्त केले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे भाषण हे भ्रमनिराश करणारे होते असा टोला दरेकरांनी लगावला आहे.

आत्मचिंतन करणे गरजेचे

एक नव्हे दोन नव्हे तर 52 पैकी 40 आमदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. याबाबतीत उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे होते पण तसे न करता दुसऱ्यांनाच सल्ला आणि टोमणे मारले जात आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कुळाचा उद्धार करत आपला टोमणी स्वभाव आपण सोडला नाही. यापेक्षा पक्षावर ही वेळ का आली ह्याचा विचार केला तर त्यांच्यासाठी फायद्याचे राहणार असल्याचे दरेकरांनी सांगितले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.