यावेळी लोक गद्दारांना धडा शिकवतील, राजन विचारेंचा आनंद परांजपेंवर हल्लाबोल

ठाणे : एकीकडे एक सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ता आहे, तर विरोधात गद्दार आहे. मागच्या निवडणुकीत जनतेने जसा गद्दाराला धडा शिकवला, तसाच धडा या वर्षीही सुज्ञ ठाणेकर शिकवतील. मी दलबदलू नाही म्हणून लोकांनी मला गल्ली ते दिल्लीपर्यंत नेलं. तेव्हा ठाणे लोकसभा मतदारसंघात निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढाई आहे, अशा प्रकारे शिवसेना खासदार राजन विचारे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद […]

यावेळी लोक गद्दारांना धडा शिकवतील, राजन विचारेंचा आनंद परांजपेंवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

ठाणे : एकीकडे एक सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ता आहे, तर विरोधात गद्दार आहे. मागच्या निवडणुकीत जनतेने जसा गद्दाराला धडा शिकवला, तसाच धडा या वर्षीही सुज्ञ ठाणेकर शिकवतील. मी दलबदलू नाही म्हणून लोकांनी मला गल्ली ते दिल्लीपर्यंत नेलं. तेव्हा ठाणे लोकसभा मतदारसंघात निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढाई आहे, अशा प्रकारे शिवसेना खासदार राजन विचारे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना टोला लगावला. येत्या निवडणुकीत ठाण्यात चांगलीच लढत बघायला मिळणार आहे. शिवाय मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक लीड यावर्षी घेणार असल्याचा आत्मविश्वास शिवसेना-भाजप युतीचे विद्यमान खासदार आणि उमेदवार राजन विचारे यांनी व्यक्त केला.

ठाणे लोकसभा मतदारसंघातून पक्षाने आणि लोकांनी मला दुसऱ्यांदा जबाबदारी दिली आहे. गेल्यावर्षी 2 लाख 80 हजारांचा लीड होता. यंदा लीड वाढणार आहे. कारण ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भायंदर परिसरात विरोधकांचे साधे नगरसेवकही नाहीत. नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेचे तब्बल 48 च्या आसपास नगरसेवक आहेत. शिवसेना आणि भाजप युती ही अभेद्य आहे. सार्वजन एकजीवाने काम करतील. चार वेळा नगरसेवक, एकदा महापौर, आमदार त्यानंतर खासदार आणि पुन्हा खासदाराची जबाबदारी हे ठाणेकरांनी माझ्या निष्ठेची पोचपावती दिली आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत लोकांनी मला नेलं. ठाणेकर सुज्ञ आहेत. ते निष्ठावंताला विजयी करतील आणि गद्दारांना धडा शिकवतील, असा टोला राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना विद्यमान खासदार राजन विचारे यांनी लगावला.

ठाण्यातील विधानसभा मतदारसंघांचं समीकरण

ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर शिवसेना दोन आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. त्यामुळे या मतदारसंघात युतीचं प्राबल्य आहे.

बेलापुर – मंदाताई म्हात्रे, भाजप

ऐरोली – संदीप गणेश नाईक, राष्ट्रवादी

ठाणे – संजय केळकर, भाजप

ओवला माजीवडा – प्रताप सरनाईक, शिवसेना

कोपरी पांचपाखाडी – एकनाथ शिंदे, शिवसेना

मीरा भाईंदर – नरेंद्र मेहता, भाजप

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.