Mumbai Municipal Corporation : ठरलं तर मग..! महापालिका निवडणुकांसाठी 2017 चाच फॉर्म्युला, नेमका बदल कशामुळे..?
2017 मध्ये महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्या दरम्यान, शहरातील बुथची संख्या 8 हजार 500 एवढी होती तर यासाठी 45 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. गत निवडणुकीत कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता. त्यामुळे वाढीव यंत्रणेचा विचारही झालेला नव्हता. मात्र, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरक्षित अंतर आणि योग्य ती काळजी घेण्याच्या हेतूने सर्वच यंत्रणेवरील ताण वाढला होता.
मुंबई : (Corona) कोरोनामुळे केवळ जनजीवनच विस्कळीत झाले नव्हते तर त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावरही झाला होता. आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटांवर यशस्वीरित्या मात केल्यानंतर आता यंदाच्या (Municipal Corporation) महापालिका निवडणुका ह्या 2017 च्या फॉर्म्युला ठरला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मध्यंतरी कोरोनाने डोके वर करताच बुथच्या संख्येसह ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी कर्मचाऱ्यांची देखील संख्या वाढवण्यात आली होती. पण आता कोरोनाचे सावट पूर्णपणे कमी झाल्याने (Administrative machinery) प्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. त्यामुळे निवडणुकांसाठी कोरोना निर्बंध पाळावे लागणार नाहीत. गतवेळच्या तुलनेत केवळ 500 बुथ अधिक राहणार आहेत तर कर्माचारी मात्र 45 हजार एवढेच राहणार असल्याचे महापालिकेचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले आहे.
कोरोनामुळे असे ठरले होते सूत्र..!
महापालिका निवडणुकांना आवधी असला तरी मतदान प्रक्रियेचे नियोजन हे तीन महिने आगोदर केले जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून 2017 च्या निवडणुकीमध्ये 8 हजार 500 वर असलेलेल्या बुथची संख्या थेट 11 हजार 500 गेली होती. तर कर्मचाऱ्यांची संख्या ही 45 हजारांवरुन थेट 70 हजारपर्यंत वाढवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला होता. 20 ते 25 हजारांनी कर्मचारी वाढवावे लागणार होते. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा यंत्रणेमध्ये बदल करण्यात आला आहे. लोकसंख्येनुसार केवळ 500 बुथ वाढवण्याची आवश्यकता आहे.
2017 मध्ये अशी होती यंत्रणा
2017 मध्ये महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्या दरम्यान, शहरातील बुथची संख्या 8 हजार 500 एवढी होती तर यासाठी 45 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. गत निवडणुकीत कोरोनाचा प्रादुर्भाव नव्हता. त्यामुळे वाढीव यंत्रणेचा विचारही झालेला नव्हता. मात्र, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुरक्षित अंतर आणि योग्य ती काळजी घेण्याच्या हेतूने सर्वच यंत्रणेवरील ताण वाढला होता. त्यानुसार नियोजन सुरु असतानाच आता कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने पालिका प्रशासनाने यंदा होऊ घालत असलेल्या निवडणुका देखील 2017 च्या दरम्यान जशा पार पडल्या होत्या त्याच पध्दतीने होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
पहिल्याच दिवशी हरकती अन् सूचनांचा पाऊस
ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने 29 जुलै रोजी वाढीव 9 प्रभागासह 236 प्रभागांसाठी आरक्षण सोडत पार पडली आहे. या आरक्षणावर पहिल्याच दिवशी म्हणजे 30 जुलै रोजीच 25 हरकती आणि सूचना दाखल कऱण्यात आल्या होत्या तर मंगळवारपर्यंत या सूनचा आणि हरकती दाखल करता येणार आहेत. याकरिता 24 वार्डात 24 ठिकाणे हे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.