हजारो शिवसैनिक अयोध्येकडे रवाना, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची जय्यत तयारी

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी अयोध्या दौरा आहे. या दौऱ्याची शिवसेनेने जोरदार तयारी केली असून शिवसैनिकांना अयोध्येला नेण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी दोन वाजता अयोध्येसाठी विशेष ट्रेन रवाना झाली. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून खानपान भरून ही रेल्वे रवाना करण्यात […]

हजारो शिवसैनिक अयोध्येकडे रवाना, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची जय्यत तयारी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी अयोध्या दौरा आहे. या दौऱ्याची शिवसेनेने जोरदार तयारी केली असून शिवसैनिकांना अयोध्येला नेण्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दुपारी दोन वाजता अयोध्येसाठी विशेष ट्रेन रवाना झाली.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून खानपान भरून ही रेल्वे रवाना करण्यात आली. सर्व शिवसैनिक ठाणे आणि कल्याण येथून मोठ्या संख्येने या विशेष ट्रेनमधून अयोध्येसाठी रवाना होणार आहेत. 21 डब्यांची ही रेल्वे शनिवारी रात्री अयोध्येत पोहोचणार आहे.

प्रवासात अनुचित प्रकार होऊ नये म्हणून मुंबई पोलीस, रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या हद्दीपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अयोध्येत जाण्यासाठी शिवसैनिकांत मोठा उत्साह आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रवाना झालेल्या ट्रेनमध्ये साधारणपणे दोन हजार शिवसैनिक होते. पुढे विविध ठिकाणांहून यामध्ये शिवसैनिकांचा समावेश होणार आहे. ठाणे, कल्याण, इगतपुरी, भुसावळ, खांडवा, ईटरसी, जबलपूर, सतना, अलाहाबाद, फैजाबाद या मार्गे अयोध्येत ही ट्रेन पोहोचणार आहे.

दरम्यान, औरंगाबादहूनही शिवसैनिकांचा पहिला जथ्था सकाळीच अयोध्येला रवाना झाला. ठाण्याहून 600, कल्याण 300, भिवंडी 250, पालघर 100, मीरा भाईंदर 250 आणि इतर विविध ठिकाणांहून आलेले 100 शिवसैनिक ट्रेनमध्ये आहेत. पुढे ही संख्या वाढत जाणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसीय दौऱ्यामुळे अयोध्या भगवीमय होणार असल्याचं औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलंय. संत महात्मांच्या भेटीला मी जात आहे. सर्व संत महात्मा सहभागी होतील असा मला विश्वास आहे, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

श्री राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळी कार सेवा आम्ही केली, तेव्हा मी आमदार होतो. उद्धव ठाकरे येत आहेत आणि आता पुन्हा त्या आठवणी जागृत झाल्या आहेत. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने शिवसैनिक येत आहेत. सर्वांना आपापली व्यवस्था करण्यासाठी सूचित करण्यात आलं आहे. त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

उद्धव ठाकरे दोन दिवस अयोध्येत राहणार आहेत. त्यामुळे संपूर्ण अयोध्या भगवीमय होणार आहे, असं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.