‘कंगनापासून दूर राहा’, गृहमंत्री अनिल देशमुख यांना हिमाचल प्रदेशमधून धमकीचे 9 फोन
अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणावरुन महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना हिमाचल प्रदेशमधून सातत्याने धमकीचे फोन येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत प्रकरणावरुन महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना हिमाचल प्रदेशमधून सातत्याने धमकीचे फोन येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Threatening phone call to Anil Deshmukh in Kangana Drugs Case). मंगळवारी (8 सप्टेंबर) ‘कंगनापासून दूर राहा, तुम्ही चुकीचं केलंय, आतातरी सुधारणा करा’ अशी धमकी देणारे जवळपास 7 फोन आले. त्यानंतर आज (9 सप्टेंबर) पहाटे देखील 2 धमकीचे फोन आले. अशाप्रकारे आतापर्यंत गृहमंत्र्यांना या प्रकरणी 9 धमकीचे फोन आलेत. हे फोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरुन येत आहेत. या धमक्यांनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने तपास करण्यास सुरुवात केली आहे.
अनिल देशमुख यांना कंगना प्रकरणावरुन धमकीचं सत्र सुरु झालं आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तींनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कंगना रनौतपासून दूर राहण्यास सांगतानाच तिच्याविरोधातील कारवाई थांबवण्याचाही सूचक इशारा दिला आहे. आम्ही जे सांगतो आहे ते आत्ताच लक्षात घ्या आणि सुधरा नाही तर याचे परिणाम वाईट होतील असंही या धमकीच्या फोनमध्ये सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी धमकी देणाऱ्यांचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौतची चौफेर कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. कंगनाच्या मुंबईतील ऑफिसमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेकेडून नोटीस पाठवण्यात आली आहे. तर दुसरीकडे ती ड्रग्ज घेत असल्याचा आरोप झाला आहे. त्याशिवाय कंगनाविरोधात विधानसभेत हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कंगना ड्रग्ज घेत असल्याचा आरोप
अभिनेता सुशांत सिंह प्रकरणावरुन कंगनाने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर शिवसेना तसेच इतर राजकीय पक्षांनी तिच्यावर टीका केली होती. नुकतचं कंगना ड्रग्ज घेत असल्याचा आरोप होत आहे. याबाबत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि सुनील प्रभू यांनी तक्रार दाखल होती. याची चौकशी मुंबई पोलिसांमार्फत केली जाणार आहे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले.
As per request submitted by MLAs Sunil Prabhu & Pratap Sarnaik, I answered in Assembly & said that Kangana Ranaut had relations with Adhyayan Suman, who in an interview said she takes drugs & also forced him to. Mumbai Police will look into details of this: Maharashtra Home Min pic.twitter.com/4ztVcqtP71
— ANI (@ANI) September 8, 2020
हेही वाचा – कंगनाच्या मदतीला केंद्र सरकार, Y+ दर्जाची सुरक्षा, कंगनाकडून अमित शाहांचे आभार
अभिनेता शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन याची एक मुलाखत सध्या व्हायरल होत आहे. यात कंगनाने त्याला कोकेन घेण्याचा आग्रह केल्याचा दावा केला आहे. आपण हॅश ट्राय केलं होतं. पण ते आवडलं नव्हतं. त्यामुळेच आपण कोकेन घेण्यास नकार दिला होता. कोकेन घेण्यास नकार दिल्यामुळे कंगनाचे आणि माझे कडाक्याचे भांडणही झालं होतं, असंही अध्ययन या मुलाखतीत म्हटलं आहे. या मुलाखतीच्या आधारे कंगनाची चौकशी केली जाणार आहे, असे अनिल देशमुखांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
कंगनाने मुंबईत पाय ठेवताच बेड्या ठोका, स्वाभिमानी मुंबईकर मैदानात, थेट पोलिसात तक्रार
कंगनाची चौफेर कोंडी, विधानसभेत हक्कभंग, ड्रग्ज प्रकरणातही चौकशी होणार
संबंधित व्हिडीओ :
Threatening phone call to Anil Deshmukh in Kangana Drugs Case