Eknath Shinde: आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, एकनाथ शिंदेंच्या ट्विटचे तीन अँगल समजून घ्या

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या मनातील खदखद आता बाहेर येताना दिसत आहे. त्यांनी एकाच ट्विट मधून तीन वेगवेगळ्या पध्दतीने पक्षाला इशाराच दिला आहे. आपण शिवसैनिक आहोत पण ते बाळासाहेबांचे असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री यांना अलगद बाजूला सारले आहे. बाळासाहेबांनी आपल्याला हिंदुत्वाची शिकवण दिल्याचे सांगत आता त्या शिवकणीचा विसर पक्षाला पडत आहे.

Eknath Shinde: आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, एकनाथ शिंदेंच्या ट्विटचे तीन अँगल समजून घ्या
एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 3:14 PM

मुंबई :  (Eknath Shinde) एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडानंतर आता त्यांच्या प्रत्येक हालचालीवर राज्याचे लक्ष लागले आहे. नाराज आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे सुरतला गेल्यानंतर त्यांनी पहिल्या ट्विटमधून तीन महत्वाच्या बाबी समोर आली आहे. बंडावरुन आता माघार नाही तर आपण बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री (Udhav Thakeray) उध्दव ठाकरे यांचे नेतृत्वच त्यांना मान्य नसल्याचेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय हिंदुत्वाच्या मुद्याला हात घातल आता (Shivsena) शिवसेनेला आपल्या हिंदुत्वाचा विसर पडत असल्याची जाणीवही त्यांनी यामधून करुन दिली आहे. पक्षाबद्दल आपले मत व्यक्त करीत असताना एकनाथ शिंदे यांनी मात्र, आपल्यावर बाळाहेब ठाकरे यांचे विचारांचा प्रभाव आहे तर आनंद दिघे यांची शिकवण असल्याची जणूकाही जाणीवच करुन दिली आहे. त्यामुळे शिवसेना नेतृत्वावर ते किती नाराज आहेत. याचा अंदाज येत आहे.

नेमकं काय म्हणायचे आहे शिंदे यांना?

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांच्या मनातील खदखद आता बाहेर येताना दिसत आहे. त्यांनी एकाच ट्विट मधून तीन वेगवेगळ्या पध्दतीने पक्षाला इशाराच दिला आहे. आपण शिवसैनिक आहोत पण ते बाळासाहेबांचे असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री यांना अलगद बाजूला सारले आहे. बाळासाहेबांनी आपल्याला हिंदुत्वाची शिकवण दिल्याचे सांगत आता त्या शिवकणीचा विसर पक्षाला पडत आहे. म्हणूनच हा निर्णय घेतल्याचेही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. शिवाय आपल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव असल्याचे सांगत आतान निर्णयापासून माघार नाहीच असा इशाराच त्यांनी पक्षाला दिला आहे की काय असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, एका ट्विटने नाराज एकनाथ शिंदे यांनी आपली सर्व भूमिकाच मांडली असून हे पक्षाला विचार करायला लावणारी आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांचा साधा उल्लेखही नाही

शिवसेनेवर नाराज असलेले एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा एका शब्दानेही उल्लेख केला नाही. केवळ बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि आनंद दिघे यांच्या शिकवणीचा उल्लेख करीत हिंदुत्व त्यांच्याप्रमाणेच जोपासले जावे. सध्या पक्षाला आपल्या उद्देशाचा विसर पडल्याची आठवणच जणूकाही शिंदे यांनी करुन दिली आहे.

शिवसेनेच्या गोटात पुन्हा खळबळ

दुसरीकडे शिवसेनेच्या गोटातील हलचालीही चांगल्याच वाढल्या आहेत. शिवसेने तातडीची बैठक घेत शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना विधान सभेतील गटनेतेपदावरून हटवलं आहे. त्यांच्या ठिकाणी गटनेतेपदी आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गुजरातमध्येह अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.