Tiger : ‘वाघा’वरुन विदर्भातील दोन वाघ आमने-सामने, वनमंत्र्यांच्या घरासमोर वाजवणार ढोल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक..

Tiger : वाघाच्या हल्ल्यावरुन विदर्भात राजकारण तापले आहे..

Tiger : 'वाघा'वरुन विदर्भातील दोन वाघ आमने-सामने, वनमंत्र्यांच्या घरासमोर वाजवणार ढोल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आक्रमक..
वाघावरुन राजकारण तापलेImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 29, 2022 | 10:14 PM

नागपूर : वाघाच्या हल्ल्यावरुन (Tigers Attack) विदर्भात राजकारण तापले आहे. वाघाच्या हल्ल्यात आठवड्याला दोन बळी जात आहे. काही लाख मिळाल्याने गेलेला माणूस परत येणार आहे का? असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. जर या प्रश्नावर राज्य सरकारने योग्य दखल घेतली नाही. वेळीच कारवाई केली नाही तर राज्याच्या वनमंत्र्यांना जागं करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.

मानवी जीव वाघापेक्षा जास्त महत्वाचे आहे. वनप्राण्यांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. पण ही संख्या किती असावी, त्यासाठी काही मर्यादा असायला हव्यात, असे वडेट्टीवार म्हणाले. विदर्भात वाघाच्या हल्ल्यात दर आठवड्याला दोघांचा बळी जात असल्याचे ते म्हणाले.

वाघाची संख्या 200 च्यावर गेल्याचे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार (Sudhir Mungantiwar) छाती ठोकपणे सांगत आहेत. वाघांच्या हल्ल्यात बळी जात असताना त्याची जबाबदारी कोणाची आहे, असा सवाल त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

वाघाच्या हल्ल्यात बळी गेलेल्या माणसांना सरकारी मदत देण्यात येत आहे. केवळ 25-30 लाख रुपये दिले म्हणजे मनुष्याची किंमत ठरते का? पण राज्याच्या वनमंत्र्यांनी माणसाच्या आयुष्याची किंमत ठरविल्याचा आरोप त्यांनी केली.

वाघांसाठी जेवढा परिसर लागतो. तेवढा ठेवावा. इतर वाघ तातडीने हलवावेत. त्याअगोदर ज्या जंगल परिसरात हे वाघ हलविण्यात येतील, त्या परिसरातील गावात व्यवस्था करणे आवश्यक आहे. मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष वाढलेला असल्याने तातडीने उपाय योजना करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली.

या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आणि तातडीने उपाय योजना न केल्यास, राज्याच्या वनमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वडेट्टीवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांना दिला आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.