Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMC Election 2022 Ward 30 : ठाणे महापालिकेत यंदा शिवसेनेचा कोणता गट बाजी मारणार? शिंदेंच्या बंडाळीनंतर ठाण्यात ठाकरेंचीही प्रतिष्ठा पणाला

शिवसेनेत उभी फूट पडल्यानं आता ठाणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट वर्चस्व मिळवतो की उद्धव ठाकरे गटाचा ठाणे महापालिकेवर झेंडा फडकतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

TMC Election 2022 Ward 30 : ठाणे महापालिकेत यंदा शिवसेनेचा कोणता गट बाजी मारणार? शिंदेंच्या बंडाळीनंतर ठाण्यात ठाकरेंचीही प्रतिष्ठा पणाला
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 10:07 PM

ठाणे : मुंबई पाठोपाठ संपूर्ण राज्याचं लक्ष ठाणे महापालिकेकडे (Thane Municipal Corporation) लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना कमकुवत झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर ठाण्यातील बहुतांश नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिवसेनेत उभी फूट पडल्यानं आता ठाणे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट वर्चस्व मिळवतो की उद्धव ठाकरे गटाचा ठाणे महापालिकेवर झेंडा फडकतो? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मागील 2017 च्या निवडणुकीमध्ये ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेच्या एकूण 67 उमेदवार निवडून आले होते. मात्र, आता परिस्थिती बदलल्यानं ठाणे महापालिकेत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मागील निवडणुकीत कोणते उमेदवार विजयी?

2017 च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 30 मधील वार्ड क्र. 30 (अ) मधून हसीना अब्दुल अजीज, वार्ड क्र. 30 (ब)मध्ये नाईक हफीजा नसरुद्दीन, वार्ड क्र. 30 (क)मधून जाफर नोमानी तर, वार्ड क्र. 30 (ड)तून डोंगरे सिराज अहमद मोहम्मद अली विजयी झाले होते.

यंदाचं आरक्षण काय?

ठाण्यातील प्रभाग क्रमांक 30 मधील वार्ड क्र. 30 (अ) सर्वसाधारण महिला, वार्ड क्र. 30 (ब) सर्वसाधारण, वार्ड क्र. 30 (क) सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षीत ठेवण्यात आलाय.

प्रभागातील मतदारांची संख्या किती?

2011 च्या जनगणनेनुसार प्रभाग क्रमांक 30 मध्ये 39 हजार 866 मतदार आहेत. त्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील मतदारांची संख्या 3 हजार 550 तर, अनुसूचित जमाती प्रवर्गातील मतदारांची संख्या 852 इतकी आहे.

प्रभागाचे नाव व व्याप्ती :

कोपरी, कोपरी कॉलनी, सिद्धार्थनगर, दौलत नगर, सिंधी कॉलनी

उत्तरः  पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पुलापासून पूर्वेकडे रेल्वे ट्रॅकने टिएमटी बस स्टॉप (पूर्व) पर्यंत, त्यानंतर रामभाऊ म्हाळगी रस्त्याने अष्टविनायक चौकापर्यंत, त्यानंतर मिठबंदर रस्त्याने कळवा खाडीपर्यंत

पूर्व : कळवा खाडीने दक्षिणेकडील ठाणे महानगरपालिका हद्दीपर्यंत

दक्षिणः ठाणे महानगरपालिका हद्दीने कळवा खाडीपासून पुर्व द्रुतगती हायवेपर्यंत (आनंद नगर जकात नाका)

पश्चिमः ठाणे महानगरपालिका हद्दी पासून (आनंद नगर जकात) पुर्व द्रुतगती हायवेने कोपरी पुलापर्यंत

पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्षउमेदवारविजयी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.