अभिनेत्री नुसरत जहाँच्या पतीला 45 हजारांचा चुना

व्हीआयपी नंबर हवा या हव्यापोटी अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांचे पती उद्योगपती निखील जैन यांना नुकतंच 45  हजारांचा गंडा घालण्यात आला आहे.

अभिनेत्री नुसरत जहाँच्या पतीला 45 हजारांचा चुना
Follow us
| Updated on: Jul 06, 2019 | 1:54 PM

कोलकाता : व्हीआयपी नंबर हवा या हव्यापोटी अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांचे पती उद्योगपती निखील जैन यांना नुकतंच 45  हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकाराबाबत निखील जैन यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र अद्याप याप्रकरणी कोणलाही अटक करण्यात आलेली नाही.

काही दिवसांपूर्वी खासदार बनलेल्या अभिनेत्री नुसरत जहाँने कोलकात्याच्या उद्योगपतीशी लगीनगाठ बांधली होती. ममतांच्या तृणमूल काँग्रेसकडून लोकसभेत निवडून आलेल्या नुसरत जहाँने, तुर्कीतील बोडरम शहरात निखील जैन या व्यावसायिकाशी हिंदू पद्धतीने लग्न केलं होतं. या दोघांच्या रिसेप्शन पार्टीच्या एक दिवस आधी निखील जैन यांनी याबाबत कोलकाताच्या सायबर पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखील जैन यांच्यासोबत कोलकत्यातील अनेकांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी अनेकांना व्हीआयपी नंबरबाबत मॅसेज पाठवण्यात आले. हा मॅसेज एका टेलिकॉम कंपनीतील अधिकाऱ्यांचा ईमेलद्वारे पाठवण्यात आले. यात तुम्हाला जर व्हीआयपी नंबर हवा असेल, तर त्यासाठी एका खात्यात 45 हजार  रुपये जमा करण्यास सांगितले होते.  त्यानुसार अनेकांनी संंबंधित खात्यात 45 हजार रुपये जमा केले. मात्र व्हीआयपी नंबर न मिळाल्याने दिल्लीतील सॉल्ट लेक परिसरात काही उद्योगपतींना याबाबत तक्रार दाखल केली. याशिवाय कोलकात्यातील अनेकांनी फसवणूक झाली असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.

दरम्यान ज्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगण्यास आले होते, ते गुजरातमधील वडोदराच्या सुभानपुरातील आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत आयटी अक्ट आणि आयपीसीद्वारे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच दिल्लीतील सायबर सेलने याप्रकरणी चौकशीही सुरु केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या प्रकारे लोकांना लुबाडणाऱ्या अनेक गँग सक्रीय झाल्या आहेत. मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे राहणाऱ्या अक्षय कुमार अग्रवालला या प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याने कोलकाता, दिल्ली, इंदौर यांसारख्या शहरातील मोठ्या उद्योगपतींना चुना लावला होता.

लोकसभा खासदार

फिल्मी दुनियेत छाप सोडल्यानंतर नुसरत जहाँ लोकसभेत निवडून गेल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने नुसरतला लोकसभा निवडणुकीत बशीरहाट मतदारसंघातून मैदानात उतरवलं होतं. नुसरतने भाजप उमेदवार शांतनू बासू यांचा तब्बल साडेतीन लाख मतांनी पराभव केला.

संबंधित बातम्या  

तृणमूलच्या खासदार अभिनेत्रीचं तुर्कीत हिंदू पद्धतीने लग्न

तीन लाखांच्या फरकाने विजय मिळवलेल्या खासदार अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.