कल्याणचा खासदार होण्यासाठी मनसेची मदत घ्यावीच लागेल; राजू पाटलांचा श्रीकांत शिंदेंना सूचक इशारा

काही दिवसांपूर्वीच मनसे आणि शिंदे गटामध्ये पोस्टर वॉर रंगल्याचं पहायला मिळालं होतं. आता पुन्हा एकदा शिंदे गट आणि मनसे आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे.

कल्याणचा खासदार होण्यासाठी मनसेची मदत घ्यावीच लागेल; राजू पाटलांचा श्रीकांत शिंदेंना सूचक इशारा
आ. राजू पाटीलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 01, 2022 | 9:58 AM

मुंबई : काही दिवसांपूर्वीच मनसे आणि शिंदे गटामध्ये पोस्टर वॉर रंगल्याचं पहायला मिळालं होतं. रस्त्याच्या रखडलेल्या कामावरून मनसेने (MNS) पोस्टर उभारत शिंदे गटावर निशाणा साधला होता. त्यानंतर शिंदे गटाकडून देखील मनसेच्या पोस्टरला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा मनसे आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. कल्याणचा पुढचा खासदार मनसेच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही, असा सूचक इशारा मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना दिला आहे. तसेच त्यांनी घराणेशाहीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. शिंदे गटात घराणेशाही नवीन नसल्याचं राजू पाटील यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले राजू पाटील?

राजू पाटील यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा जोरदार घणाघात केला आहे. कल्याणचा पुढचा खासदार मनसेच्या मदतीशिवाय होऊ शकणार नाही, असा सूचक इशारा त्यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना दिला आहे. तसेच शिंदे गटात घराणेशाही नवीन नसल्याचे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

मी आमदारकीला देखील उभं राहात नव्हतो, मात्र राजसाहेब म्हटले म्हणून आमदारकीची निवडणूक लढवली. ते उद्या म्हटले खासदारकीची निवडणूक लढव तर तीही मी लढवेल. मात्र आम्ही तेव्हाच जाहीर केलं होत लोकसभा निवडणूक लढवायची नाही. परंतु भविष्यात कल्याणचा जोही कोणी खासदार होईल मग तो मनसेचा असेल किंवा इतर कुठल्याही पक्षाचा त्याला मनसेची दखल घ्यावीच लागेल असं राजू पाटील यांनी म्हटलं आहे. राजू पाटील यांच्या या टीकेमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.