आणीबाणीच्या काळात तुरुंगावास भोगलेल्यांना पेन्शन देणार; उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा आम्ही तो निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे . जे 3600 लोकतंत्र संग्राम सेनानी आहेत. ज्यांना आणीबाणीच्या काळात कारावासात जावं लागलं. त्यांना ही पेन्शन देण्यात येणार आहे.
मुंबई – आणीबाणीच्या काळात ज्या लोकांना तुरुंगवास भोगावा लागला . स्वातंत्र्य सेनांनी देशातल्या वेगवेगळ्या सरकारांनी त्यांना गौरव निधी किंवा पेन्शन (Pension)देण्याचा निर्णय पंधरा वीस वर्षांपूर्वी घेतला होता. यामध्ये हा निर्णय यूपीने , बिहार, मध्यप्रदेशने राजस्थान या राज्यांनी घेतला होता . महाराष्ट्रात तो निर्णय प्रलंबित होता. आम्ही 2018 साली तो निर्णय घेतला होता. 2020 साली मागील महाविकास आघाडी सरकारने(Mahavikas aghadi Government) तो निर्णय स्थगित केला होता. मात्र आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा आम्ही तो निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे . जे 3600 लोकतंत्र संग्राम सेनानी आहेत. ज्यांना आणीबाणीच्या काळात कारावासात जावं लागलं. त्यांना ही पेन्शन देण्यात येणार आहे. तसेच अजून 1800 अर्ज आले आहेत त्याची निवड मेरीट नुसार केली जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Fadnavis)यांनी दिली.
बूस्टर डोसची मोहीम राबवणार
याबरोबरच कोरोना प्रादुर्भाव कमी होत असला तरी नागरिकांनी योग्यती काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच केंद्र सरकारने कोरोना लसीकरण मोहिमेनंतर आता नागरिकांना कोरोनाचा बूस्टर डोस मिळावा यासाठी देशभरात मोहीम राबविण्याचा निर्णय घेतले आहे. यानुसार येत्या 75 दिवसात राज्यातील 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोसची मात्रा मिळणार आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा ही मोहीम राबवणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनांनतर याची अंमलबजावणी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमाच्या समोर दिली आहे.
पेट्रोल व डिझेलच्या किमतीत कपात
याबरोबरच राज्यातील पेट्रोल व डिझेलच्या किमतीत अनुक्रमे 5 व 3 रुपयांची कपात करण्यात आली आहे. कॅबिनेट बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यात काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय़ घेण्यात आलेयामुले राज्यातील जनतेला मोठा दिसला मिळाला आहे. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘ सरकार हे सामान्यांना दिलासा देणारं आहे.