नवी दिल्ली : धन्यवाद प्रस्ताव सादर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minster Narendra Modi) यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. सरकारी योजनांची आकडेवारी वाचून दाखवत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावेळीच विरोधकांनी गरादोळ घालायला सुरुवात केली. यानंतर मोदींनी थांबून विरोधकांची फिरकी घेतली. लोकसभा अध्यक्षांनीही विरोधकांना ताकीद दिली आणि खाली बसवलं खरं. पण त्यानंतर मोदींनी केलेल्या वक्तव्यावर लोकसभेत एकच हशा पिकला होता. ‘आपका प्यार अजरामर रहें’ असं मोदींनी म्हटल्यानंतर संपूर्ण सभागृह खळखळून हसलं. नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कुणाला उद्देशून म्हटलं, याचीही आता चर्चा रंगली आहे. गरिबांच्या घरालाही आता किंमत येऊ लागली आहे, असं म्हटल्यानंतर लोकसभेते विरोधी पक्षनेते संतापले. अधिर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी याबाबत मोदींना टोकण्याचा प्रयत्न केला. पण लोकसभा अध्यक्षांनी त्यांना थांबवलं. यानंतर मोदींनी केलेली कृतीनं सभागृहात एकच हशा पिकला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत धन्यवाद प्रस्ताव सादर करतेवेळी सरकारी योजनांचा पाढा वाचवून दाखवत होते, प्रधानमंत्री आवास योजनेबाबत जेव्हा मोदी बोलू लागले, तेव्हा मात्र विरोधक आक्रमक झाले. काहींनी गोंधळ घालायला सुरुवात केला. विरोधकांचा गोंधळ पाहून मोदींनीही आपलं भाषण थांबवलं. यानंतर मोदींनी काही वेळ घेत विरोधकांना टोला लगावला.
आक्रमक झालेल्या अधिर रंजन चौधरी यांनी मोदींच्या धन्यवाद प्रस्तावातील काही मुद्द्यांना खोडून काढण्याचा प्रयत्न केला. तुम्ही वचनं दिली पण ती पूर्ण केली नाही, असा आरोप अधिर रंजन चौधरी यांनी केला. अधिर रंजन चौधरींचा आक्रमक पवित्रा पाहून यावेळी मोदींनी थांबून त्यांना बोलू दिलं. तेव्हा लोकसभा अध्यक्षांनी मात्र अधिर रंजन यांना टोकलं. त्यांना थांबवलं आणि खाली बसायला सांगितलं. धन्यवाद प्रस्ताव मांडण्यासाठी बोलायला उभे राहिलेलेही मोदी या संपूर्ण गदारोळात काही वेळ खाली बसले. गदारोळ शांत झाल्यानंतर त्यांनी अधिर रंजन चौधरी यांना मी तुमचे आभार मानू का असं विचारलं. मग खरोखर आभारही मानत मोदींनी पुन्हा बोलायला सुरुवात केली. एक क्षण थांबत मोदींनी अधिर रंजन चौधरी यांना उद्देशून आपका प्यार अजरामर रहे, असं वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानं सभागृहाती सगळेच नेते खळखळून हसले. यानंतर मोदींनी पुन्हा एकदा आपला प्रस्ताव सादर करताना काँग्रेसला चिमटे काढायला सुरुवात केली.
काल लता दिदींचा मृत्यू झाला. अनेक वर्ष देशाला मोहीत केलं. प्रेरीत केलं आणि भानेनं भरलं. त्यांनी ३६ भाषेत गाणं गायलं. त्यांनी आपल्या गाण्यातून आपल्या देशाची एकता कायम ठेवली. अखंड भारतासाठी त्यांची गाणी प्रेरणादायी होते, असं म्हणत मोदींनी आपल्या धन्यवाद प्रस्तावाची सुरुवात केली. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात बदल झाला. एक नवा वर्ड ऑर्डर आलं त्यात आपण जगत आहोत. कोरोना काळानंतर जग एका नव्या वर्ड ऑर्डरकडे नव्या व्यवस्थेकडे वेगाने जात आहे., असंही त्यांनी म्हटलंय.
Speaking in the Lok Sabha. Watch https://t.co/WfOOasml0G
— Narendra Modi (@narendramodi) February 7, 2022
PM Modi Speech in Parliament LIVE : पंतपधान मोदींचं भाषण लाईव्ह, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
ओवेसींवर गोळ्या झाडणारे हल्लेखोर कोण? किती जण घेतले ताब्यात? अमित शाह यांनी दिलं उत्तर