अमित शाहांचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे गुजरातला रवाना
मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आज गांधीनगरमधून लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरणार आहेत. अमित शाहांचा अर्ज दाखल करतेवेळी स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. सकाळी 8.30 च्या सुमारास मातोश्रीवरुन उद्धव ठाकरे विशेष विमानाने गुजरातला रवाना झाले आहेत. सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची जय्य्त तयारी सुरु आहे. विविध लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल […]
मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आज गांधीनगरमधून लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज भरणार आहेत. अमित शाहांचा अर्ज दाखल करतेवेळी स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. सकाळी 8.30 च्या सुमारास मातोश्रीवरुन उद्धव ठाकरे विशेष विमानाने गुजरातला रवाना झाले आहेत.
सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांची जय्य्त तयारी सुरु आहे. विविध लोकसभा मतदार संघासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातमधील गांधीनगर येथून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यानुसार आज दुपारपर्यंत अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. दरम्यान अमित शाह यांचा अर्ज भरतेवेळी स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे. तसेच आज गांधीनगरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांचा गुजरात दौरा कसा असेल?
सकाळी 8 च्या सुमारास उद्धव ठाकरे गुजरातला जाण्यासाठी रवाना होतील. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता गांधीनगर येथे उद्धव यांची सभा होईल. ही सभा झाल्यानंतर दुपारी एक वाजता अमित शाह यांचा अर्ज भरतेवेळी ते उपस्थित राहतील आणि त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता ते मुंबईला परततील.
या आधी गांधीनगर या लोकसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी निवडणूक लढवत होते. परंतु यंदा त्यांचे तिकीट कापत गांधीनगरमधून अमित शाहांना तिकीट देण्यात आले. भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव जाहीर करण्यात आले होते.
गेल्या कित्येक दिवसांपासून निवडणुकीदरम्यान शिवसेना भाजप युती होईल का? याबाबत शंका व्यक्त करण्यात येत होती. महाराष्ट्रात ‘शिवेसना मोठा भाऊ राहणार’ अशी टिका शिवसेनेने भाजपला वारंवार सांगितले होतं. तर अमित शाह यांनी शिवसेनेला ‘पटक देंगे’ असे म्हटले होते. परंतु या सर्व गोष्टी पडदा टाकत उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती केली आणि लोकसभा -विधानसभा निवडणुकांना एकत्र लढण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, गुजरातमध्ये अमित शाह यांचा अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे यांना स्वत: शहा यांनी उद्धव यांना आमंत्रण दिले होते. उद्धव यांनी ही हे आमंत्रण स्विकारले आहे. यानिमित्ताने पुन्हा उद्धव ठाकरे हे शिवसेना-भाजप युतीतली एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत.