Video : Eknath Shinde | आज किंवा उद्या राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पडेल, खासदार रामदास तडस याचं मोठं विधान
आता शिवसेनेसोबत राहण्यात काही अर्थ नाही. कामं होत नाही. शिवसेना बरोबर नाही. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. त्यामुळं त्यांनी वेगळा गट निर्माण करण्याचं ठरविलं. एकनाथ शिंदेंवर अन्याय झाला. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी वेगळा गट स्थापन करावा आणि सरकारमध्ये यावं, असं रामदास तडस म्हणाले.
वर्धा : राज्यसभेत (Rajya Sabha) महाविकास आघाडी सरकारला भाजपनं धोबीपछाड केलं. त्यानंतर विधान परिषदेत (Legislative Council) आपला पाचवा उमेदवार विजयी करण्यात भाजपला यश आलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे काही आमदारांसह सूरतला गेले. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासंदर्भात रामदास तडस म्हणाले, अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारला झाले. परंतु, आमदार (MLA) सुखी नव्हते. कामं होत नव्हती. यांचे आपसात वाद राहत होते. राज्यसभेची निवडणूक आली. त्यामध्ये शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला. त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक आली. त्यातही त्यांचीच मतं फुटले. याचा अर्थ अडीच वर्षाच्या कालखंडात त्यांचे स्वतःचे आमदार त्यांच्यासोबत नव्हते. आता शिवसेनेचे आमदार शिवसेना सोडून गेले असल्याचं रामदास तडस म्हणाले. एकनाथ शिंदेंसोबत ते गेल्यानं हे सरकार आज किंवा उद्या पडणार आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाहा व्हिडीओ
वेगळा गट स्थापन करून सरकारमध्ये यावं
रामदास तडस म्हणाले, एकनाथ शिंदे हे वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे किंवा भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर काही दबाव असू शकतो. कारण सातत्यानं एकनाथ शिंदे यांना अडीच वर्षाच्या कालावधित दाबण्याचा प्रयत्न झाला. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे खंबीर कार्यकर्ते होते. पण, वारंवार त्यांचा अपमान करण्यात आला. वर्धापन दिली त्यांना बोलू दिलं नाही. पक्षात वारंवार त्यांचा अपमान होत होता. तरीही ते पक्षासोबत राहिले. पण, आता त्यांना वाटलं की, आता शिवसेनेसोबत राहण्यात काही अर्थ नाही. कामं होत नाही. शिवसेना बरोबर नाही. बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. त्यामुळं त्यांनी वेगळा गट निर्माण करण्याचं ठरविलं. एकनाथ शिंदेंवर अन्याय झाला. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी वेगळा गट स्थापन करावा आणि सरकारमध्ये यावं, असं रामदास तडस म्हणाले.
वारंवार अपमान होत असल्यानं निर्णय
एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेत सातत्याने अन्याय होत होता. शिवसेनेच्या वर्धापन दिनाला त्यांना भाषण देऊ दिले नाही. मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात न आमदार सुखी होते न कोणी. एकनाथ शिंदे शिवसेनेचा खंबीर आणि चांगला कार्यकर्ता होता. मात्र त्यांचा वारंवार अपमान केला जात होता. पक्षात वारंवार अपमान होत असतानाही ते पक्षात राहिले. मात्र आता त्यांना वाटलं की आता शिवसेनेसोबत राहणं बरोबर नाही. त्यांना वाटलं की पहिले बाळासाहेबांची जी शिवसेना होती ती आता राहिली नाही, असं मत वर्धातील भाजपचे खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केलं.