Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 13 जूलै 2023, या राशीच्या लोकांनी जोखमीचे काम आज टाळावे

आजचे राशी भविष्य, जाणून घ्या कसा जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांना नोकरीत विशेष संधी उपलब्ध होईल.

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 13 जूलै 2023, या राशीच्या लोकांनी जोखमीचे काम आज टाळावे
राशी भविष्यImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 9:23 AM

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

बारा राशींचे आजचे राशी भविष्य

मेष

आज आपल्या प्रभावशाली व्यक्तीमत्वामुळे आपल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक दृष्ट्या अनेक मोठे प्रश्न हातावेगळे कराल. व्यापारात अचानक सफलता मिळेल. नोकरीत प्रत्यक्ष अमल यामुळे हातून योग्य कामे होतील. शुभवार्ता ऐकायला मिळतील. संततीकडून समाधान लाभेल. सामाजिक सांस्कृतिक कार्यात  सहभाग व्हाल. तरुणांना परदेशात नोकरीची संधी मिळेल. राजकीय क्षेत्रातील सहकारातील व्यक्तींना मोठे परिवर्तन पाहायला मिळेल.

वृषभ

आज तणावग्रस्त वातावरण निर्माण होईल. वादविवाद किंवा भांडणामुळे आपले मानसिक स्वास्थ बिघडेल. रोजगारात जबाबदारी नुसार काम करा. मनात अशांती असल्या कारणाने आपल्याला संकटाचा सामना करावा लागेल. उद्योगधंद्यात  काही व्यवहार अनपेक्षित नुकसानकारक ठरतील. क्षणिक फायद्यासाठी अविचारी गुंतवणूक करू नका. विचार पूर्वक निर्णय  घ्या. आर्थिक हानी नुकसान  फसवणुक होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

मिथुन

आज उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना कामात यश देणारे दिनमान आहे. रोजगात समाधानकारक स्थिती राहील. काहीना पगारवाढ व बदलीची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल मोठ्या गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मित्र किवा सहकारी यांच्याकडून मदत मिळेल. मनामध्ये उर्जा व आत्मविश्वास वाढीस लागेल. वैवाहिक जोडीदाराच्या महत्वकांक्षा पूर्ण होतील.

कर्क

आज मनोबल व आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळेल. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिनमान उत्तम राहिल. तुमच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. विवाहइच्छुकांचे विवाह जमतील. निरनिराळ्या सुचलेल्या कल्पना कल्पना अंमलात आणा. परदेशगमनाचा योग आहे.

सिंह

आजचा पीडादायक असणार आहे. नोकरी रोजगारात फार मोठा धोका पत्करणे योग्य ठरणार नाही. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावित. मनावर संयम ठेवा. फार मोठ्या यशाची अपेक्षा करू नका. जोखमीचे काम आज करू नका. प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल. सावधतेने वाटचाल करावी. एखादा प्रकरणात विनाकारण गुंतले जावू शकता. वाईट संगत आगलट येईल. दुरचे प्रवास शक्यतो टाळा. वाहने सावकाश चालवा. गैरमार्गाचा अवलंब टाळा.

कन्या

आज लक्ष्मीदायक योग आहे. कामात यश मिळेल. रोजगारात एखादी महत्वाची पण विलंबाने झालेली कृती फायदयाची जाणवेल. काही नवीन आलेले प्रस्तावाचे स्वागत केले जाईल. योजलेली काम वेळेत पूर्ण होतील. खर्च वाढणार आहे. परंतु उत्पन्नात देखिल वाढ होईल. महिला वर्गाशी सौजन्याने वागा. नवदांपत्यास आंनदाची बातमी मिळेल. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार मात्र टाळावेत. व्यापारात भागीदारांकडून नवीन प्रस्ताव येतील.

कन्या

आज लक्ष्मीदायक योग आहे. कामात यश मिळेल. रोजगारात एखादी महत्वाची पण विलंबाने झालेली कृती फायदयाची जाणवेल. काही नवीन आलेले प्रस्तावाचे स्वागत केले जाईल. योजलेली काम वेळेत पूर्ण होतील. खर्च वाढणार आहे. परंतु उत्पन्नात देखिल वाढ होईल. महिला वर्गाशी सौजन्याने वागा. नवदांपत्यास आंनदाची बातमी मिळेल. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार मात्र टाळावेत. व्यापारात भागीदारांकडून नवीन प्रस्ताव येतील.

तुळ

आज विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील. आपल्यावर आळ येण्याची शक्यता संभवते. कौटुंबिक किंवा मालमत्ते विषयक प्रश्न निर्माण होतील. कर्ज घेण्यापासून दूर राहा. विरोधका कडून त्रास होईल. मनस्वास्थ बिघडण्याचा शक्यता आहे. मानहानी होण्याची संभावना आहे. शांत व विवेक बुद्धीने कार्य करावे. मोठे आर्थिक व्यवहार टाळावेत  व्यवहारात फसवणुकीची शक्यता आहे. कागदोपत्री व्यवहार तपासून पहावा.

वृश्चिक

आज आपल्या कामकाजामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. आपल्या बुदधीच्या जोरावर आलेल्या योजना यशस्वी होतील. व्यापारात काहींना अचानक धनलाभाच्या संधी मिळतील. नोकरीत व्यापारात चांगले काहीतरी करण्याची मानसिकता निर्माण होईल. वाचनाची आवड निर्माण होईल. अविवाहितांना विवाह योग आहे. शासकीय कामकाजाचे प्रश्न मार्गी लागतील.

धनू

आज आपल्या अपेक्षेप्रमाणे यश आणि फळ मिळणार आहे. चैनीच्या वस्तु खरेदी करण्याचा योग आहे. व्यापारी वर्गाला आपले व्यापार कौशल्य सिद्ध करता येईल. महत्वाचे निर्णय फायदेशीर ठरतील. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. मनोबल वाढेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. घरात शुभसामाचार अथवा मंगलकार्य असा योग आहे. सार्वजनिक सांस्कृतिक कार्यात सहभाग घ्याल.

मकर

आज रोजगारात काम करण्याच्या शैलीत सुधारणा होईल. समाजात मानसन्मान वाढेल. नोकरीत विशेष संधी उपलब्ध होईल. अनेकांकडून सहकार्य लाभेल. नातेवाईकांचे भांवडाचे विशेष सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळणार असून व्यापारात फायदेशीर व्यवहार राहतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहिल. आर्थिकदृष्या कोणावरही कोणत्याही आश्वासनांवर विसंबून न राहता हाती येईल तेच खरे ही भूमिका घ्यावी.

कुंभ

आज व्यवसायातील योजना गुप्त ठेवा. काही विशेष कामानिमित्त आपणास लांबच्या प्रवासाचे नियोजन आखावे लागेल. व्यवसायात अनुकूल असे यश मिळेल. आर्थिक योग उत्तम आहेत. कोणावरही अंधविश्वास बाळगू नका. एखादी आनंदाची शुभवार्ता ऐकायला मिळेल. कुंटुबातील पत्नीकडून विशेष सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले आहे.कौटुंबिक सुख व शांतीचे वातावरण राहिल.

मीन

आज आखलेल्या योजना पूर्ण होणार आहेत. मित्र किंवा सहकारी यांच्याकडून मदत मिळेल. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव वाढेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. नोकरीत मोठे लाभ होतील तसेच परिचितीचा गट वाढेल. आपल्या कामात त्याच्या उपयोग करून घेऊ शकाल. व्यवसायात फायदा होईल. आर्थिक लाभ होतील.  उसनवारी वसूल होईल. चांगल्या बातम्या ऐकण्यास मिळतील. मान सन्मानात वाढ होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.