Live Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
[svt-event title=”बॉम्बस्फोटातील आरोपीचा कोठडीत मृत्यू” date=”25/04/2019,4:44PM” class=”svt-cd-green” ] नागपूर – 1993 च्या मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी अब्दुल गनी तुर्कचा नागपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्यू [/svt-event] [svt-event title=”नगरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ससाणेंचा राजीनामा” date=”25/04/2019,3:12PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी राजीनामा दिला आहे. ससाणे गटाने शिर्डी मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. […]
[svt-event title=”बॉम्बस्फोटातील आरोपीचा कोठडीत मृत्यू” date=”25/04/2019,4:44PM” class=”svt-cd-green” ] नागपूर – 1993 च्या मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील आरोपी अब्दुल गनी तुर्कचा नागपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्यू [/svt-event]
[svt-event title=”नगरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ससाणेंचा राजीनामा” date=”25/04/2019,3:12PM” class=”svt-cd-green” ] काँग्रेसचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी राजीनामा दिला आहे. ससाणे गटाने शिर्डी मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला मदत न करण्याची भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी लोकसभा प्रचारासाठी मुंबईऐवजी शिर्डी लोकसभा मतदारसंघाला प्राधान्य दिले आहे. [/svt-event]
[svt-event title=”श्रीलंकेत पुन्हा बॉम्बस्फोट” date=”25/04/2019,3:11PM” class=”svt-cd-green” ] श्रीलंकेमध्ये आज (25 एप्रिल) पुन्हा एकदा बॉम्ब हल्ला झाला आहे. बॉम्ब हल्ला झाल्याचा आवाज तेथील स्थानिकांनी ऐकला. हा बॉम्बस्फोट राजधानी कोलंबोपासून 40 किलोमीटर अतंरावर पुगोडानगर येथे झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. [/svt-event]
[svt-event title=”गांगुलीनंतर सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मणकडून BCCI ने लेखी उत्तर मागितले” date=”25/04/2019,11:41AM” class=”svt-cd-green” ] बीसीसीआयचे (BCCI) लोकपाल न्यायमूर्ती डी. के. जैन यांनी माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मणला नोटीस बजावली आहे. हे दोघे भारतीय क्रिकेट सल्लागार समितीचे (CAC) सदस्य आहेत. तसेच आयपीएलच्या फ्रँचाइजचेही मेंटॉर आहेत. त्यामुळेच ही नोटीस बजावण्यात आली. [/svt-event]
[svt-event title=”लवकरच 200-500 च्या नव्या नोटा बाजारात, गांधींच्या फोटोत हलका बदल” date=”25/04/2019,11:40AM” class=”svt-cd-green” ] भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) पुन्हा एकदा 200 आणि 500 च्या नवीन नोटा बाजारात आणत आहे. या नव्या नोटा जुन्या नोटांपेक्षा काहीशा वेगळ्या असतील. याबाबत आरबीआयने ट्वीट करत माहिती दिली. [/svt-event]
[svt-event title=”पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू” date=”25/04/2019,11:39AM” class=”svt-cd-green” ] उमरगा येथील तलमोड गावात पोलिसांच्या मारहाणीत एका 70 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. दत्तू मोरे असे त्यांचे नाव आहे. पोलिसांनी उमरगा येथे कोम्बिंग ऑपरेशन राबवले, त्यावेळी पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मोरे यांचा जीव गेल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. [/svt-event]
[svt-event title=”जपान विधानसभा निवडणुकीत ‘योगीं’चा विजय” date=”25/04/2019,11:37AM” class=”svt-cd-green” ] भारतीय वंशाचे जपानी नागरिक योगेंद्र पुराणिक यांनी जपान विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. जपानमधील निवडणुकीत विजय मिळवणारे पुराणिक पहिले भारतीय आहेत. ते 41 वर्षांचे आहेत. विशेष म्हणजे पुराणिक हे महाराष्ट्रातील पुण्याचे आहेत. [/svt-event]
[svt-event title=”सलमान खान आणि बॉडीगार्डकडून मारहाण, पोलिसात तक्रार” date=”25/04/2019,11:35AM” class=”svt-cd-green” ]
सलमान खान आणि बॉडीगार्डकडून मारहाण, पोलिसात तक्रार दाखलhttps://t.co/na1XlpCMHJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 25, 2019
[/svt-event]
[svt-event title=”राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला, रात्री 12 वाजता थरार” date=”25/04/2019,11:22AM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या पतीवर रात्री बाराच्या सुमारास अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला. देवनार टाटानगर येथील वार्ड क्रमांक 140 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका नादिया शेख यांचे पती मोहसिन शेख यांच्यावर हल्ला करुन, हल्लेखोर पळून गेले. या हल्ल्यात जखमी झालेल्या स्थानिकांनी मोहसिन शेख यांना झेन रुग्णालयात दाखल केलं. रात्री बाराच्या सुमारास हा थरार रंगला. [/svt-event]