बीडमध्ये खासदार प्रितम मुंडेंसमोर तब्बल 35 उमेदवारांचं आव्हान
बीड : महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात बीडच्या जागेसाठी मतदान होणार आहे. विद्यमान खासदार असलेल्या डॉ. प्रितम मुंडे यांना तब्बल 35 उमेदवारांचं आव्हान असेल. उमेदवारी अर्ज छाननीनंतर आणि अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर बीडमध्ये एकूण 36 उमेदवार रिंगणात आहेत, ज्यात 26 उमेदवार अपक्ष आहेत आणि 10 उमेदवार नोंदणीकृत पक्षाचे आहेत. अपक्ष उमेदवारांमुळे प्रशासनाचा भार वाढणार आहे. बीडमध्ये […]
बीड : महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात बीडच्या जागेसाठी मतदान होणार आहे. विद्यमान खासदार असलेल्या डॉ. प्रितम मुंडे यांना तब्बल 35 उमेदवारांचं आव्हान असेल. उमेदवारी अर्ज छाननीनंतर आणि अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर बीडमध्ये एकूण 36 उमेदवार रिंगणात आहेत, ज्यात 26 उमेदवार अपक्ष आहेत आणि 10 उमेदवार नोंदणीकृत पक्षाचे आहेत. अपक्ष उमेदवारांमुळे प्रशासनाचा भार वाढणार आहे.
बीडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात थेट लढत होणार आहे. राष्ट्रवादीकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपकडून प्रितम मुंडे या उमेदवार आहेत. एकीकडे राष्ट्रवादीकडून पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी कंबर कसली आहे. तालुकानिहाय बैठका ते घेत आहेत. तर प्रितम मुंडेंनीही प्रचारात आघाडी घेतली आहे.
बीडमध्ये तब्बल 36 उमेदवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मतविभाजन होणार आहे. त्यामुळे मुख्य पक्षांसमोर मतांचं समीकरण जुळवण्याचं आव्हान आहे. बहुजन वंचित आघाडीकडूनही बीडमध्ये उमेदवार देण्यात आला आहे. एमआयएम आणि भारिप यांच्या बहुजन वंचित आघाडीमुळेही मतांचं विभाजन होणार आहे.
व्हिडीओ पाहा :