मतदारांची संख्या, मतदान केंद्र ते ओळखपत्र, निवडणुकीची A टू Z माहिती

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा (Total voters list and Voting center )सज्ज झाली आहे.

मतदारांची संख्या, मतदान केंद्र ते ओळखपत्र, निवडणुकीची A टू Z माहिती
Follow us
| Updated on: Oct 21, 2019 | 7:25 AM

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा (Total voters list and Voting center )सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी (Total voters list and Voting center)  देखील उपक्रम राबवले जात आहेत. दुसरीकडे राजकीय पक्षांनीही जाहीर प्रचारसभांमधून नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. आज (19 ऑक्टोबर) सायंकाळी 6 प्रचाराच्या तोफाही थंड होतील.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांगांचा समावेश आहे. एकूण मतदारांपैकी 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750 मतदार पुरुष, 4 कोटी 28 लाख 43 हजार 635 मतदार महिला, 2 हजार 634 मतदार तृतीयपंथी आहेत. यातील 3 लाख 96 हजार मतदार हे दिव्यांग आहेत.

विशेष म्हणजे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कर्तव्यावर असलेल्या मतदारांची संख्याही मोठी आहे. 1 लाख 17 हजार 581 मतदार हे सर्व्हिस मतदार आहेत. ते पोस्टाने आपला मतदानाचा हक्क पार पाडतील.

मतदार जनजागृती मोहिमा

आतापर्यंत 20.8 लाख नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यापैकी 14.40 लाख मतदारांनी प्रत्यक्ष मतदान यंत्रावर येऊन मतदानाचं प्रशिक्षण घेतलं. मतदारांमध्ये जनजागृतीसाठी सदिच्छादूतांचीही नेमणूक करण्यात आली होती. या मोहिमेत ‘सदिच्छादूत’ म्हणून अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ. निशिगंधा वाड, अभिनेत्री उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणूक 2019 मध्ये राज्यात एकूण 96 हजार 661 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात मुख्य मतदान केंद्रे 95 हजार 473 आणि सहायक मतदान केंद्रे 1 हजार 188 इतके आहेत. खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352 ‘सखी मतदान केंद्रे’ देखील स्थापन केली जाणार आहेत.

मतदारांसाठी मतदान केंद्रावर सोई-सुविधा

मतदारांना मतदानादरम्यान केंद्रावर किमान अत्यावश्यक सुविधांचीही व्यवस्था केली जाणार आहे. यात पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, दिव्यांग मित्र आदी सेवांचा समावेश आहे. दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी करणे, यासाठी PwD ॲपची सुविधा देण्यात आली आहे. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांकरता व्हीलचेअर आणि रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे.

दिव्यांग आणि जेष्ठ नागरिक मतदारांसाठी वेगळ्या रांगेची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. अंध मतदारांच्या सोयीसाठी मतदान केंद्रांवरील सूचनाफलक आणि मतदार यादी, ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आली आहे. मतदान यंत्रावर ब्रेल लिपी मुद्रीत केली असल्याने त्यांना कोणाच्याही मदतीखेरीज मतदान करता येणे शक्य होणार आहे.

लहान मुलासह मतदानास येणाऱ्या महिला मतदारांच्या मुलांकरिता पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या सुविधेप्रमाणे मतदान केंद्राची रचना करण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोईचे व्हावे, म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत करण्याचा महत्त्वाचा निर्णय देखील प्रशासनाने घेतला आहे. जेथे पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर मतदान केंद्र आहे तेथे लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे.

यंत्रणा सज्ज

विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा

मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.

मतदारांच्या सुविधेसाठी

  • आचारसंहितेसंबंधात तक्रारी करण्यासाठी सी-व्हिजील ॲपची सुविधा उपलब्ध.
  • ईव्हीएम व्हीव्हीपॅट वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या नियंत्रणाकरिता GPS Tracking App
  • मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाईन-1950.’ या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येईल.
  • मतदारांसाठी ‘व्होटर हेल्पलाईन ॲप’ ही सुरु.
  • दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD ॲपची सुविधा.

मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र

मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक. भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल अशावेळी पुढील अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.

1. पासपोर्ट (पारपत्र)

2. वाहन चालक परवाना

3. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)

4. छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबूक

5. पॅनकार्ड

6. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड

7. मनरेगा जॉबकार्ड

8. कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड

9. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज

10. खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र

11. आधारकार्ड

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.