मुंबई : राज्यातील वाहतूक व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना संकटकाळात राज्यातील वाहतूक व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या आर्थिक समस्यांबाबत चर्चा केली. (Traffic Vehicle Delegation Meet Raj Thackeray)
कोरोना संकटकाळात राज्यातील वाहतूक व्यावसायिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना आर्थिक समस्या भेडसावत आहेत. तसेच अनेक वाहन चालकांनी बँका आणि फायनान्स कंपनींकडून कर्ज घेतलं आहे.
मात्र कोरोना काळात आर्थिक अवस्था बिकट असल्याने अनेकांना कर्जाचे हफ्त भरता येत नाहीत. त्यामुळे वारंवार बँकांकडून त्रास दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर वाहतूक व्यावसायिक संघटनांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
या भेटीनंतर मी स्वत: सर्व बँक आणि फायनास कंपन्यांना पत्र लिहित मुदत वाढीची मागणी करेन, असे आश्वासन राज ठाकरेंनी या वाहतूक शिष्टमंडळाला दिलं. राज ठाकरे या सर्व बँका आणि फायनास कंपन्यांना पत्राची मुदत वाढवून देण्यास सांगणार आहेत, अशी प्रतिक्रिया मनसे वाहतूक संघटनेचे नेते संजय नाईक यांनी दिली.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनलॉक सुरु आहे. त्यानंतर डॉक्टर, कोळी महिला, जिम मालक-चालक, हॉटेल व्यावसायिक, मुंबईचे डबेवाले यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी या सर्वांनी राज ठाकरेंकडे विविध मागण्यांचं साकडं घातलं होतं. यानंतर काही समस्यांवर तोडगाही निघाला होता. त्यामुळे अनेकांना विश्वास वाटत आहे.
संबंधित बातम्या :
राज्यातील ग्रंथालयांची कवाडे खुली करा, ग्रंथालय प्रतिनिधी राज ठाकरेंच्या भेटीला
Library Reopen | राज ठाकरेंना भेटताच ग्रंथालये सुरु, ग्रंथप्रेमींना दिलासा