Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई मेट्रोसाठी पुन्हा वृक्षतोड, महापालिकेकडे 508 झाडे हटवण्याचा प्रस्ताव

आरे येथील मेट्रो कारशेडमधील झाडांचा बळी दिल्यानंतर आता मेट्रो स्टेशन आणि मार्गात आडवी येणारी तब्बल 508 झाडे हटवण्यात येणार (Tree cutting due to metro work) आहेत.

मुंबई मेट्रोसाठी पुन्हा वृक्षतोड, महापालिकेकडे 508 झाडे हटवण्याचा प्रस्ताव
Follow us
| Updated on: Feb 12, 2020 | 7:19 PM

मुंबई : आरे येथील मेट्रो कारशेडमधील झाडांचा बळी दिल्यानंतर आता मेट्रो स्टेशन आणि मार्गात आडवी येणारी तब्बल 508 झाडे हटवण्यात येणार (Tree cutting due to metro work) आहेत. यामध्ये 162 झाडे मुळापासून कापण्यात येणार आहेत. तर 346 झाडे पुनर्रोपणाच्या नावाखाली हटवण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव शुक्रवारी (14 फेब्रुवारी) पालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे वृक्षप्रेमी मुंबईकरांचे लक्ष (Tree cutting due to metro work) लागले आहे.

आरे येथील मेट्रो कारशेडसाठी कापण्यात आलेल्या झाडांमुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेसह विरोधक आणि सामाजिक संस्था आक्रमक झाल्या होत्या. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरे वसाहतीमधील झाडे कापण्यास स्थगिती देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा मेट्रो प्रकल्पासाठी 508 झाडे हटवण्याचा प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समिती समोर मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगर ते ओशिवरा नाला दरम्यानच्या नियोजित मेट्रो लाईन 2ए च्या बांधकामात अडथळा निर्माण करणारी 32 झाडे कापण्यात येणार असून 90 झाडे पुनर्रोपीत करण्यात येणार आहेत. त्याशिवाय गोरेगाव पश्चिमेकडील मेट्रो 2ए प्रकल्पाच्या गोरेगाव आणि बांगूरनगर स्टेशनच्या बांधकामात आडवी येणारी 29 झाडे कापणे आणि 85 झाडे पुनर्रोपीत करण्याची परवानगी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून मागण्यात आली आहे.

कांदिवली पश्चिम येथील मेट्रो लाईन 2ए च्या लालजीपाडा ते महावीर नगर दरम्यानच्या कामात अडथळा निर्माण करणारी 53 झाडे कापणे आणि 21 झाडे पुनर्रोपीत करण्यात येणार आहेत. तर दहिसर पूर्व ते डी. एन. नगर दरम्यानची 64 झाडे कापणे आणि 37 झाडे पुनर्रोपीत करण्यात येणार आहेत.

लिंक रोड ते चारकोप कारशेड डेपो, अथर्व कॉलेजजवळ मालाड पश्चिम येथील 11 झाडे कापणे आणि 86 झाडे पुनर्रोपीत करण्यात येणार आहेत.

याबाबतचे प्रस्ताव वृक्षप्राधिकरण समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहेत. यावर चर्चा करून निर्णय घ्यायचा असल्यामुळे राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसेनेची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

आमची भूमिका मेट्रो विरोधी नाही झाडं वाचली पाहिजेत अशी आहे, अशी भूमीका शिवसेनेची आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचा पालिकेतील जुना मित्र पक्ष भाजप यांनी मात्र “विकास हा झाला पाहिजे , मुंबईकरांचा प्रवास मेट्रोमुळे सुखकर होणार असेल तर मेट्रोच्या आड येणारी झाड तोडावीत”. अस भाजपने म्हटलं आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.