Ravikant Tupkar : मंत्रिमंडाळाच्या विस्तारासाठी मोर्चे काढण्याची वेळ आणू नका, तुपकरांचा नव्या सरकारला इशारा

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन 36 दिवस उलटून गेले तरी देखील अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. ही खेदजनक बाब असल्याचे रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.

Ravikant Tupkar : मंत्रिमंडाळाच्या विस्तारासाठी मोर्चे काढण्याची वेळ आणू नका, तुपकरांचा नव्या सरकारला इशारा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 07, 2022 | 9:11 AM

बुलडाणा : राज्यात नवे सरकार आले.  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असून, सध्या दोनच मंत्री राज्याचा कारभार पहात आहेत. त्यामुळे राज्यात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्लीवाऱ्या सुरूच आहेत. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे विरोधकांकडून नव्या सरकारवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यानंतर आता स्वामिभानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी देखील निशाणा साधला आहे.  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेऊन 36 दिवस उलटून गेले तरी देखील अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही ही खेदजनक बाब आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आम्हाला मोर्चे काढायला लावू नका असा इशारा देखील तुपकर यांनी यावेळी दिला आहे.

काय म्हणाले तुपकर

मुख्यमंत्री आणि   उपमुख्यमंत्र्यांनी  शपथ घेऊन 36 दिवस उलटून गेलेत, मात्र अजूनही मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. ही खेदजनक बाब आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी आम्हाला मोर्चा काढायला लावू नका. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की तात्काळ मंत्रिमंडळाचा विस्तार करावा, दोघांच्या कॅबिनेटने जसे शहरांच्या नामकरणाबाबत तातडीने निर्णय घेतले, तसेच निर्णय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शेतकऱ्यांसाठी घेण्यात यावेत.  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट मदत करावी अशी मागणी तुपकर यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांचीही टीका

दरम्यान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने नव्या सरकारवर टीका केली आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झाले आहे. विदर्भात तर गंभीर परिस्थिती आहे. पुराचे पाणी शेतात घुसून हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये तातडीने नुकसानीचा आढावा घेऊन त्यांना मदतीची गरज असल्याचे पवार यांनी म्हटले होते. मात्र राज्यात सध्या दोनच मंत्री असल्यामुळे कामाला मर्यादा येते. त्यामुळे लवकरात लवकर मंत्रिमंडाळाचा विस्तार केला जावा असं अजित पवार यांनी आपल्या गडचिरोली दौऱ्यादरम्यान म्हटले होते.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.