“अजित पवार तात्काळ राजीनामा द्या”, भाजप नेत्याने अशी मागणी का केली?

"अजित पवार तात्काळ राजीनामा द्या", अशी मागणी भाजप नेत्याने केली आहे. वाचा सविस्तर...

अजित पवार तात्काळ राजीनामा द्या, भाजप नेत्याने अशी मागणी का केली?
Follow us
| Updated on: Dec 31, 2022 | 12:06 PM

नाशिक : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तात्काळ विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी केली आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावर भाजप आध्यात्मिक आघाडीने आक्षेप घेतला आहे.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदू समाजाचे स्वाभिमान, अस्मिता आहेत. अजित पवार म्हणतात की, ‘छ्त्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते…’ त्यांनी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी तात्काळ विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी तुषार भोसले यां केली आहे.

अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान केल्यामुळे या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार अजित पवार यांना नाही, त्यांनी राजिनामा द्याला, अशी मागणी त्यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत असं बोलण्याचा अधिकार अजित पवार यांना कुणी दिला? अजित पवार यांनी तातडीने माफी मागावी राजीनामा द्यावा, असं ते म्हणाले.

अजित पवार यांचे 14 मे 2019 चे ट्विट भोसले यांनी दाखवले. अजित पवार 2019 पर्यंत संभाजी महाराज यांना धर्मवीर मानायला तयार होते. मात्र आता 2022 मध्ये कशी त्यांना उपरती आली ?, असा सवाल त्यांनी केलाय.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाही प्रश्न विचारायचा आहे की, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपली भूमिका बदलणार का? ते अजित पवार यांचा निषेध करणार का? संजय राऊत यांची दातखीळ बसली आहे का? छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्मासाठी बलिदान दिले. त्यांच्याबद्दल असं बोलून अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाला डाग लावलाय, असं म्हणत तुषार भोसले यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.