औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) जरी व्यासपीठावर उपस्थित नसले तरी ते लघु उद्योजकाचे प्रश्न सोडवले जातील. तुमच्या सगळ्या मागण्या शिंदे-फडणवीस सरकार एकून घेईल अन् त्यांचा पाठपुराव केला जाईल. त्याला न्याय दिला जाईल, असा शब्द मंत्री उदय सामंत यांनी लहान उद्योजकांना दिलाय.
अडव्हॅनटेज महाराष्ट्र एक्सो 2023 हे प्रदर्शन मराठवाड्याच्या बाहेर पण न्यायला हवं. मुंबई, पुणे नागपूर इथं देखील असं प्रदर्शन भरायला हवंय. जे महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी नाही, ते राजकीय नेतृत्व मराठवाड्यात आहे.आम्ही सर्वांनी मिळून दिवे लावलेले आहेत! दिव्यांचा वेगळा अर्थ घेऊ नका, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केलीय.
3 वर्षानंतर पुढचं प्रदर्शन 50 एकरात होईल. तुम्ही ज्या-ज्या मागण्या केल्या आहेत. त्या मागण्यांचा आचारसंहितेनंतर विचार करू. आचारसंहितेनंतर तारीख ठरवा शुभारंभ करू, असं सामंत म्हणालेत.
महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात उद्योग पसरला पाहिजे. आम्ही कुणावर मेहरबानी करत नाही तर आमचं सरकारचं कर्तव्यच आहे. आम्ही बेईमानी करत नाही.मोठ्या उद्योगांना जसे रेड कार्पेट दिले जाते तसेच छोट्या उद्योगांना रेड कार्पेट दिले जाईल, असा शब्द त्यांनी यावेळी नव उद्योजकांना दिलाय.
आम्ही जाणारा प्रकल्प रोखला. ज्या राज्यातील राजकीय वातावरण चांगले नसेल तर उद्योग येत नाहीत. राजकीय परिस्थिती अस्थिर असेल तर उद्योग येण्याचा विचार करतात. सरकारने कॅबिनेट सब कमिटीची,हाय पावर बैठक झाली नाही म्हणून वेदांता आणि एअरबस प्रकल्प गेला. आम्ही 55 हजार बेरोजगार लोकांना रोजगार देण्याचा संकल्प केलाय, असंही उदय सामंत म्हणालेत.
समृद्धी लवकर झाला असता तर 6000 कोटी ऐवजी 12 हजार कोटी गुंतवणुक झाली असती. स्वतःच्या क्षेत्रातील माणसाला मोठं कस करायचं हे तुमच्याकडून शिकावं, हे आम्ही तुमच्याकडून शिकतोय. माझ्या मंत्रालयापेक्षा मासिया संघटनेचं ऑफिस मोठं आहे, असंही ते म्हणालेत.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या जीवापेक्षा आम्हाला काही मोठं नाही. बिघाड झाल्याने येणे झाले नाही तरी आम्हाला तिथून शुभेच्छा मिळाल्या. तरी त्या आमच्यासाठी खूप आहेत, असं प्रदर्शनात सहभागी झालेले उद्योजक म्हणालेत.