“उद्याच्या दसरा मेळाव्यात आम्हीच बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं उधळणार!”
मंत्री उदय सामंत यांनी उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यावर भाष्य केलंय. काय म्हणालेत? पाहा...
गिरीश गायकवाड, प्रतिनिधी, Tv9 मराठी, मुंबई: मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्यावर भाष्य केलंय. आमचा मेळावा हा ऐतिहासिक आहे. यंदाच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या या ऐतिहासिक मेळाव्याला ऐतिहासिक गर्दी होईल, असं सामंत म्हणाले आहेत. याशिवाय शिंदे गटातील प्रवेशावरही त्यांनी भाष्य केलंय. बरेच लोक शिंदे गटात येण्यासाठी उत्सुक आहेत. उद्याही काही आमच्याकडे येण्याची शक्यता आहे. तसं चित्र उद्याच्या मेळाव्यात पाहायला मिळू शकतं., असं उदय सामंत म्हणालेत.
आज आणि उद्या मुंबईत बॅनरवॉर पाहायला मिळणार आहे. लाखो कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची रेलचेल पाहायला मिळेल. हे सगळं होत असताना मी ठामपणे एक गोष्ट सांगू इच्छितो की आम्हीच बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं उधळणार… !, असं सामंत म्हणालेत.
उद्याच्या भाषणावरही त्यांनी आपलं मत मांडलं आहे. आमचावर खालच्या पातळीची टिका झाली. उद्धव ठाकरेंच्या उद्याच्या मेळाव्यातही अशीच टिका होऊ शकते, असं वाटतंय. पण सगळ्यांनीच पातळी सांभाळून बोललं पाहिजे. ठाकरेंनी तसंच बोलावं, असं सामंत म्हणालेत.
शरद पवारांनी जो सल्ला दिलाय तो योग्य आहे . शिवसेनेनं तो लक्षात घ्यावा. आमच्यावषयी बोलताना, टिका करताना तारतम्य बाळगावं, असंही सामंत म्हणालेत.
उद्धव ठाकरे आम्हाला गद्दार बोलतात. शिवराळ भाषा वापरतात. काहीही बोलतात. पण आम्ही एका शब्दाने त्यांना बोलत नाही, असंही सामंत म्हणालेत.
उद्या शिवसेनेचा शिवाजीपार्कवर तर शिंदेगटाचा बीकेसी मैदानावर मेळावा होतोय. यात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.