अंधेरी पूर्व पोटनिवडणूक कोण जिंकणार?, उदय सामंत म्हणतात आम्ही….

| Updated on: Oct 14, 2022 | 11:47 AM

सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक कोण जिंकणार?, उदय सामंत म्हणतात आम्ही....
Image Credit source: social media
Follow us on

मुंबई : सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. बीएमसीने (BMC) राजीनामा न स्विकारल्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी मुंबई हाय कोर्टात धाव घेतली होती. हाय कोर्टाकडून ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  हाट कोर्टाने महापालिकेला राजीनामा मंजूर करण्याचे आदेश दिल्याने, ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मार्ग आता मोकाळा झाला आहे. लटके या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र या सर्व घडामोडी घडत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना (Shiv sena) या दोन्ही गटांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असा दावा करण्यात येत आहे.

उदय सामंत यांची प्रतक्रिया

दरम्यान याबाबत शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांना या निवडणुकीबाबत विचारलं असता, त्यांनी आमचाच उमेदवार निवडून येईल अशी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही कशापद्धतीने तयारी केली, उमेदवार निवडूण आणण्यासठी कशापद्धतीने जोर लावला जाईल हे समोरच्याला कळेलच. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचा उमेदवार आम्ही उभा करणार आहोत. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे घोषणा करतीलच, आमचा उमेदवार विजयी होईल अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा

कोकणातील गटबाजीवर प्रतिक्रिया

दरम्यान यावेळी उदय सामंत यांनी कोकणातील गटबाजीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. कोकणात कितीही गट झाले तरी कोकण पूर्वीपासून बाळासाहेबांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला होता. तो आजही आहे आणि भविष्यात देखील बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच बालेकिल्ला राहणार असं सामंत यांनी म्हटलं आहे.