अहमदनगर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या (Ahmednagar District Co-operative Bank) नुतन अध्यक्षपदी उदय शेळके (Uday Shelke) यांची तर उपाध्यक्ष पदी माधवराव कानवडे (Madhavrao Kanwade) यांची बिनविरोध निवड झाली. निवडीसाठी संचालक मंडळाची एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत उदय शेळके यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्ष पदी माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. (Uday Shelke elected as the new chairman of Ahmednagar District Co-operative Bank and Madhavrao Kanwade as the vice chairman)
अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड होण्याआधी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत संचालकांची बैठक झाली. त्यानंतर 12.30 वाजता सर्व संचालक बँकेच्या सभागृहात आले. या ठिकाणी निवडणुक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी उदय शेळके आणि माधवराव कानवडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर शेळके आणि कानवडे यांचा सत्कार करण्यात आला. बँकेची उत्कृष्ट कारभाराची परंपरा पुढे चालविण्याचा विश्वास अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी व्यक्त केला. जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीने वर्चस्व राखलं असून अध्यक्षपदाची पहिली संधी राष्ट्रवादीला देण्यात आली आहे.
संचालक मंडळाच्या बैठकीला संचालक मंत्री शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माधवराव कानवडे, राहुल जगताप, अमोल राळेभात, प्रशांत गायकवाड, आशा तापकीर, अशोक भांगरे, अनुराधा नागवडे, गणपत सांगळे, विवेक कोल्हे, सीताराम गायकर, अंबादास पिसाळ, अण्णासाहेब म्हस्के, अरुण तनपुरे, चंद्रशेखर घुले हे संचालक उपस्थित होते.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेल उदय शेळके हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात उपाध्यक्षपदी निवड झालेले माधवराव कानवडे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचे कट्टर समर्थक मानले जातात.
(Uday Shelke elected as the new chairman of Ahmednagar District Co-operative Bank and Madhavrao Kanwade as the vice chairman)
हे ही वाचा :