उदयनराजे रडले, पवारसाहेब वडीलस्थानी, त्यांच्याविरुद्ध लढणार नाही!
राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपवासी झालेल्या उदयनराजे भोसले (Sharad Pawar vs Udayanraje Bhosale) यांच्या डोळ्यात आज पाणी आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर उदयनराजेंच्या (Sharad Pawar vs Udayanraje Bhosale) डोळ्यात पाणी आलं.
सातारा : राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपवासी झालेल्या उदयनराजे भोसले (Sharad Pawar vs Udayanraje Bhosale) यांच्या डोळ्यात आज पाणी आलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नावर उदयनराजेंच्या (Sharad Pawar vs Udayanraje Bhosale) डोळ्यात पाणी आलं. ते साताऱ्यात बोलत होते.
उदयनराजे म्हणाले, “शरद पवार मला वडिलांच्या स्थानी आहेत. लोकसभा निवडणुकीला जर शरद पवार उभे राहिले तर मी उभा राहणार नाही. फक्त पवार साहेंबांनी त्यांचा दिल्लीतला बंगला आणि गाडी मला वापरायला द्यावी”
“मी सांगतो ना… ते आदरणीय काल पण होते, आज पण आहेत आणि भविष्यातही असतील. ते जर उभे राहिले, तर मी फॉर्म भरणार नाही. फक्त एकच त्यांनी करावं, दिल्लीतला बंगला आहे ना, गाडी आहे, तेवढी मुभा आपल्याला द्यावी”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर पडल्याच्या शक्यतेने ‘गॅसवर’ असेलल्या उदयनराजे भोसले यांना दिलासा मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यातील लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक (Satara Loksabha Bypoll Declared) जाहीर करण्यात आली . 21 ऑक्टोबरला सातारा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचं मतदान होणार असून विधानसभेसोबतच म्हणजेच 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.
उदयनराजे रडले, म्हणाले, पवारसाहेब वडीलस्थानी, त्यांच्याविरुद्ध लढणार नाही! https://t.co/h4gGpCgK1t pic.twitter.com/Q07H661Rf6
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 24, 2019
सातारा पोटनिवडणुकीत उदयनराजे विरुद्ध शरद पवार?
दरम्यान, सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांच्याविरुद्ध शरद पवारांनी लढावं अशी इच्छा डब्बेवाला संघटनेचे नेते सुभाष तळेकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे साताऱ्यात शरद पवार उदयनराजेंविरुद्ध निवडणूक लढवतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
श्रीनिवास पाटील रिंगणात?
राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे साताऱ्याच्या जागेसाठी उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशीच लढत होणार असल्याचं मानलं जात आहे. सुरुवातीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पोटनिवडणुकीत उतरवणार असल्याची चर्चा (Satara Loksabha Bypoll Hold) होती.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा
महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर 21 सप्टेंबरला वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या. यासोबतच दोन्ही राज्यांत आचारसंहिता लागू झाली.
संबंधित बातम्या