माझं मत मी परखडपणे मांडत असतो, गोपीचंद पडळकरप्रकरणी उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया

पडळकर प्रकरणी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले उदयनराजे भोसले यांचीही प्रतिक्रिया आली आहे. (Udayanraje Bhonsales reaction on Sharad Pawar Padlakar)

माझं मत मी परखडपणे मांडत असतो, गोपीचंद पडळकरप्रकरणी उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Jun 30, 2020 | 2:09 PM

सातारा :  भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर, विविध राजकीय पक्षातून प्रतिक्रिया आल्या. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी मंत्री मधुकर पिचड यांनीही पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यानंतर आता राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी खासदार उदयनराजे भोसले यांचीही प्रतिक्रिया आली आहे. (Udayanraje Bhonsales reaction on Sharad Pawar Padlakar)

“भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याबाबत बोलताना कोणी कोणाबद्दल काय बोलले हे त्यांनी मला विचारुन बोलले नाहीत. माझं मत मी परखडपणे मांडत असतो. शरद पवार आणि पडळकर त्यांचे ते बघून घेतील”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

ज्यांनी कुणावर टीका केली, त्याच्यावर त्यांना त्यांना विचारा. मी परखडपणे माझं मत मांडत असतो. ते जे कोणी बोलले ते मला विचारुन बोलले नाहीत. जे कुणी उत्तर देणार आहेत, ते मला विचारुन देणार नाहीत, असं उदयनराजेंनी नमूद केलं.

वाचा :  भाजपमध्ये गेलो असलो तरी शरद पवारांसोबत काम केलंय, पडळकरांच्या टीकेनंतर ज्येष्ठ नेता आक्रमक

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन त्याचे बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कोरोना परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. साताऱ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्याबाबत विचारलं असता, कोरोनाचा बाऊ केला जात आहे, असं उदयनराजे म्हणाले.

हर्ड इम्युनिटी वाढवण्याची गरज

“ज्या पद्धतीने स्वीडनमध्ये हर्ड इम्युनिटी अर्थात सामाजिक रोगप्रतिकारशक्ती केली आहे, त्या पद्धतीने भारतात केली जावी. कारण इतर व्हायरसप्रमाणे कोरोना हा व्हायरस आहे, त्याचा बाऊ करु नये. इतर आजारात देखील अनेकांचा मृत्यू होतो. लोकांना घाबरवू नका, लोकांना वस्तूस्थितीला सामोरे जावे लागेल. लॉकडाऊनमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता किती वेळा लॉकडाऊन करणार” असा सवाल उदयनराजेंनी विचारला. कोरोना बाबत लोकांनी काळजी घ्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.

विठ्ठलाला साकडं

पंढरपूरला आषाढी एकादशीला देवाला साकडे घालण्यासाठी मी जाणार होतो, पण सध्याचा परिस्थितीमुळे मी जाऊ शकत नाही. पण देवाला एकच साकडे घालीन की या परिस्थितीत राजकारण करु नका, सगळ्यांनी एकत्र येऊन लोकांचा विचार करावा. महाराष्ट्राने दिशा देण्याचे काम केले आहे. आताच्या परिस्थितीत सुद्धा राज्याने पाऊल उचलून त्याचे अनुकरण इतर राज्यांनी केले पाहिजे, असं उदयनराजे म्हणाले.

(Udayanraje Bhonsales reaction on Sharad Pawar Padlakar)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.