मुख्यमंत्र्यांशी दोन तास चर्चा, ‘या’ अटींमुळे उदयनराजेंचा भाजप प्रवेश लांबणीवर

उदयनराजेंच्या (Udayanraje Bhosale and CM meeting) काही अटींवर ठोस निर्णय न होऊ शकल्यामुळे काहीही निर्णय होऊ शकला नाही. उदयनराजेंनी सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर मंगळवारी लगेच मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांशी दोन तास चर्चा, 'या' अटींमुळे उदयनराजेंचा भाजप प्रवेश लांबणीवर
Follow us
| Updated on: Sep 10, 2019 | 10:17 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale and CM meeting) यांचा भाजप प्रवेश पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याची माहिती आहे. त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोन तास चर्चा केली. पण उदयनराजेंच्या (Udayanraje Bhosale and CM meeting) काही अटींवर ठोस निर्णय न होऊ शकल्यामुळे काहीही निर्णय होऊ शकला नाही. उदयनराजेंनी सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर मंगळवारी लगेच मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली.

उदयनराजेंच्या अटी काय?

उदयनराजेंचा भाजप प्रवेश हा दिल्लीत होईल हे यापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं. पण उदयनराजेंच्या आणखी काही अटी आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार,

  • सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच व्हावी
  • पोटनिवडणुकीत अपेक्षित निकाल न आल्यास राज्यसभेवर नियुक्ती

राष्ट्रवादीकडूनही मनधरणीचे प्रयत्न

उदयनराजेंनी पक्ष सोडू नये यासाठी राष्ट्रवादीकडूनही जोरदार प्रयत्न सुरु असल्याची माहिती आहे. कारण, विधानसभा निवडणूक तोंडावर असताना उदयनराजे जाणं हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का आहे. फक्त साताऱ्यातच नव्हे, तर राज्यभरात उदयनराजेंचा स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रवादीला फायदा होईल. यासाठी राष्ट्रवादी विविध माध्यमातून उदयनराजेंची मनधरणी करत आहे.

भाजपची तिसरी मेगाभरती

भाजपने यापूर्वी दोन टप्प्यात झालेल्या पक्ष प्रवेशांमध्ये अनेक नेत्यांना पक्षात घेतलं होतं. आता तिसऱ्या टप्प्यात उर्वरित नेते भाजपात जाणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईतील ज्येष्ठ नेते गणेश नाईक, काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील, काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांच्यासह इतर काही नेते भाजपात प्रवेश करणार आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.