मी पडलो तर पडलो, माझ्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घ्या : उदयनराजे

"माझ्या मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक लावा. ती जुन्या पध्दतीने बॅलेट पेपरवर घ्या. मी पडलो तर पडलो पण ही देशाला लागलेली कीड वेळेत काढली नाही तर देशाला सावरण अवघड होईल", असं उदयनराजे म्हणाले.

मी पडलो तर पडलो, माझ्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घ्या : उदयनराजे
Follow us
| Updated on: Jun 22, 2019 | 9:47 AM

सातारा :  साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले ईव्हीएमबाबत आक्रमक झाले आहेत. ईव्हीएम बंद करुन जुन्या पद्धतीने बॅलेट पेपरवर मतदान प्रकिया सुरु करण्याची मागणी त्यांनी केली आहे. इतकंच नाही तर “माझ्या मतदारसंघात पुन्हा एकदा निवडणूक लावा. ती जुन्या पध्दतीने बॅलेट पेपरवर घ्या. मी पडलो तर पडलो पण ही देशाला लागलेली कीड वेळेत काढली नाही तर देशाला सावरण अवघड होईल”, असं उदयनराजे म्हणाले.

रडीचा डाव उदयनराजे खेळत नाही. मी विजयी झालो आहे. पण EVM मुळे 376 मतदारसंघात उमेदवार पराभूत झाले आहेत, असा आरोप उदयनराजेंनी केला. EVM वर साडेचार हजार कोटी खर्च होणार असतील तर लहान मुलांकडून चिठ्या काढून आमदार-खासदार निवडा असा टोला, उदयनराजेंनी निवडणूक आयोगाला लगावला.

उदयनराजे भोसलेंनी EVM आणि बॅलेट पेपरवर येणाऱ्या खर्चाची तुलना केली. देशात EVM वर सरकार साडेचार हजार कोटीहून अधिक विनाकारण खर्च करत  असल्याचा आरोप उदयनराजेंनी केला.

 सातारा लोकसभा मतदारसंघ

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा सातारा लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 मतं, तर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार498 मतं मिळाली. उदयनराजे भोसले यांनी मागील 2014 च्या निवडणुकीत जवळपास साडेतीन लाख मतांनी विजय मिळवला होता. मात्र यंदा त्यांची आघाडी निम्म्याने घटली आहे. 2014 मध्ये उदयनराजे भोसले 3 लाख 66 हजार 594 मतांनी विजयी झाले होते. यंदा उदयनराजेंना इतकं लीड घेता आलं नाही. 2019 च्या निवडणुकीत राजेंना 1,26,528 मतांनी  विजय मिळवता आला.

VIDEO: 

संबंधित बातम्या 

Satara Lok sabha result 2019 : सातारा लोकसभा मतदारसंघ निकाल 

Satara Lok Sabha Results : सातारा लोकसभा निकाल 2019  

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.