Udayanraje | महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता : उदयनराजे भोसले

 खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ची घोषणा दिल्याने खासदार उदयनराजे यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज दिल्याचे काल समोर आले होते

Udayanraje | महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता : उदयनराजे भोसले
Follow us
| Updated on: Jul 23, 2020 | 1:20 PM

नवी दिल्ली : “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भरपूर राजकारण झालं. महाराजांचा अपमान झाला असता, तर गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, पण तसं काही झालंच नाही व्यंकय्या नायडू यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही” अशा शब्दात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथविधीनंतर काही घडलेच नसल्याचा दावा केला. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ची घोषणा दिल्याने खासदार उदयनराजे यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी समज दिल्याचे काल समोर आले होते. (Udayanraje Bhosale on Jai Bhavani Jai Shivaji Slogans)

सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला तो, फक्त जे राज्यघटनेत नाही त्याला घेतला, माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती, आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झालं, महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

“माझा स्वभाव पाहता मी ऐकून घेईन असं वाटतं का तुम्हाला? या सभागृहाचा चेअरमन मी आहे, असं फक्त ते (नायडू) म्हणाले. आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला, व्यंकय्या नायडूंनी उलट त्यांना थांबवलं, पवारसाहेब तिथेच बसले होते, आपण त्यांना विचारा, जे घडलं नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, ही हात जोडून कळकळीची विनंती” असे उदयनराजे म्हणाले.

व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचं केलं नाही, त्यांनी काही चुकीचं केलं असतं, तर मीच माफीची मागणी केली असती. असंही उदयनराजे म्हणाले.

“संजय राऊत आमच्याकडे दाखले मागतात आणि आता ते आम्हाला विचारतायेत? संजय राऊतांना काहीही उत्तर देणार नाही” असे उत्तर उदयनराजे यांनी राऊत यांच्या टीकेला दिले. बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पण शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब हा माझा प्रश्न आहे? शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो वर आहे, यावर आक्षेप का घेतला नाही?” असा प्रतिप्रश्न उदयनराजे  यांनी केला. “बाळासाहेब मोठे वाटत असतील तर शिवसेनेने ठाकरे सेना नाव ठेवावं” असा टोलाही त्यांनी लगावला.

“मी का राजीनामा देऊ? जे घडलंच नाही, त्याबद्दल कशाला राजीनामा देऊ? मी माझी शपथ नीट घेतली. ज्यांनी आक्षेप घेतला, त्यांनी राजीनामा द्यायला हवा” असेही उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे काय म्हणाले?

सभापती व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला तो, फक्त जे राज्यघटनेत नाही त्याला घेतला, माझी हात जोडून राजकारण करणाऱ्यांना विनंती, आतापर्यंत अनेक गोष्टींवरुन राजकारण झालं, महाराजांचा अवमान झाला असता, तर मी गप्प बसलो नसतो, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता

पवारसाहेब तिथेच बसले होते, आपण त्यांना विचारा, जे घडलं नाही, ते भासवण्याचा प्रयत्न करू नका, ही हात जोडून कळकळीची विनंती

माझा स्वभाव पाहता मी ऐकून घेईन असं वाटतं का तुम्हाला? या सभागृहाचा चेअरमन मी आहे, असं फक्त ते (नायडू) म्हणाले

आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला, व्यंकय्या नायडूंनी उलट त्यांना थांबवलं, पवारसाहेबांना विचारा काय झालं

व्यंकय्या नायडू यांनी काही चुकीचं केलं नाही, त्यांनी काही चुकीचं केलं असतं, तर मीच माफीची मागणी केली असती

संजय राऊत आमच्याकडे दाखले मागतात आणि आता ते आम्हाला विचारतायेत?

संजय राऊतांना काहीही उत्तर देणार नाही

कोणताही अपमान झालेला नाही, जे घडलं नाही त्यावर राजकारण नको

बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पण शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब हा माझा प्रश्न आहे, शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो वर आहे, यावर आक्षेप का घेतला नाही?

शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब हा माझा प्रश्न आहे, बाळासाहेब मोठे वाटत असतील तर शिवसेनेने ठाकरे सेना नाव ठेवावं

मी का राजीनामा देऊ? जे घडलंच नाही, त्याबद्दल कशाला राजीनामा देऊ? मी माझी शपथ नीट घेतली. ज्यांनी आक्षेप घेतला, त्यांनी राजीनामा द्यायला हवा

नेमकं काय झालं?

राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांनी राज्यसभा सदनात काल (22 जुलै) खासदारकीची शपथ घेतली. भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच खासदारकीची शपथ घेतली. इंग्रजीतून घेतलेल्या शपथेनंतर घोषणा दिल्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांना उदयनराजे यांना समज द्यावी लागली.

“I Udayanraje Pratapsinhraje Bhosale…” अशी इंग्रजी भाषेत दमदार आवाजात शपथ घेण्यास उदयनराजेंनी सुरुवात केली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी “जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी” अशी घोषणा दिली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर

“तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या” अशा शब्दात व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.

शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक

“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरु झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्याकडून सांगली सातारा बंदची अद्याप घोषणा नाही. जय भवानी! जय शिवाजी!!!!!!!” असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू माफी मागत नाहीत, तोपर्यंत खासदार उदयनराजे यांनी राज्यसभेच्या कामात भाग घेऊ नये” अशी भूमिका ब्राह्मण महासंघाच्या अनिल दवे यांनी घेतली आहे.

“नायडू आणि भाजपने आम्हा शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत, भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी” अशी मागणी अनिल दवे यांनी केली आहे.

हेही वाचा : व्यंकय्या नायडूंविरोधात शिवसेना-राष्ट्रवादी आक्रमक, ब्राह्मण महासंघाकडून माफीची मागणी

व्यंकय्या नायडू आणि केंद्रातील भाजप सरकारचा जालन्यात निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी जय शिवाजी’ असे लिहिलेली वीस लाख पत्रे जालना जिल्ह्यातून पाठवण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष जगन्नाथ काकडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोस्टकार्ड पत्र पाठवले.

“छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपची असलेली खोटी भावना स्पष्ट दिसली” असे म्हणत व्यंकय्या नायडू आणि भाजपच्या वक्तव्याच्या निषेधार्थ वाशिम जिल्हा शिवसेनेच्या वतीने निदर्शने देण्यात आली.

संबंधित बातम्या :

इंग्रजीतून शपथ घेऊन उदयनराजे म्हणाले, जय भवानी, जय शिवाजी, सभापतींकडून समज

6 वेळा विधानसभा, 1 विधानपरिषद, 7 लोकसभा, दोनदा राज्यसभा, पवारांना सोळावी शपथ

शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदींची मराठीतून शपथ, काँग्रेस नेता म्हणतो आता शिवसैनिक शोभता!

(Udayanraje Bhosale on Jai Bhavani Jai Shivaji Slogans)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.