भाजप प्रवेशाचा मुहूर्त लांबणीवर, उदयनराजे सध्या राष्ट्रवादीतच
उदयनराजेंनी घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत (Udayanraje Bhosale meeting) काहीही ठोस निर्णय न झाल्यामुळे राजे सध्या तरी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं दिसून येतंय.
सातारा : विधानसभेपूर्वी राज्यात विविध पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग जोरात सुरु आहे. पण यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale meeting) हे भाजपात जाणार असल्याची चर्चा असली तरी ही फक्त चर्चाच बनली आहे. कारण, उदयनराजेंनी घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत (Udayanraje Bhosale meeting) काहीही ठोस निर्णय न झाल्यामुळे राजे सध्या तरी राष्ट्रवादीतच राहणार असल्याचं दिसून येतंय.
उदयनराजेंच्या सतत बदलणाऱ्या विधानांमुळे भाजपाच्या नेत्यांमध्ये आणि राष्ट्रवादीच्या गोटात सुद्धा संभ्रमावस्था आहे. उदयनराजे आणि त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची मुख्य बैठक पुणे येथे पार पडली. यामध्येही कोणताच निष्कर्ष निघाला नाही. त्यामुळे आता उदयनराजे भोसले नक्की काय भूमिका घेतात याकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागलयं.
उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीत राहिले, तर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला त्यांचा उपयोग होईल. पण उदयनराजे भाजपात गेले तर मात्र साताऱ्यात राष्ट्रवादीच्या आमदारांच्या संखेत घट झालेली पाहायला मिळेल, असं राजकीय विश्लेषक सांगतात. सोमवारच्या बैठकीत उदयनराजेंनी सध्या तरी यू टर्न घेतला असल्याचं इतक्या दिवसाच्या घडामोडींनंतर स्पष्ट झालंय. मात्र उदयनराजेंच्या आता पर्यंतच्या बदलत्या भूमिका पाहिल्या तर या पुढील काळातही उदयनराजे नेमकी काय भूमिका घेतील हे सांगणं अवघड आहे.
सातारा जिल्ह्यात आधीच शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ उदयनराजे भाजपमध्ये गेले तर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या निश्चितच कमी होऊ शकते. त्याचबरोबर उदयनराजेंचा भाजपला फायदा होईल याच कुणाचंही दुमत नसावं. पण उदयनराजेंची स्पष्ट भूमिका कधी जाहीर होते याकडे सध्या लक्ष लागलंय.