मुलींकडे नाही मग मुलं मुलांकडेच बघणार का? तक्रार सांगणाऱ्या मुलींना राजेंचं उत्तर
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांच्या या बिनधास्त स्वभावाचा अनुभव यावेळी साताऱ्यातील विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाला. मुलं छेड काढत असल्याची तक्रार एका मुलीने केली आणि उदयनराजेंनी दिलेलं उत्तर ऐकून सर्व मुलांनी टाळ्या आणि शिट्टी वाजवून त्याला दाद दिली. उदयनराजे भोसले प्रचाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन युवक-युवतींशी संवाद साधत […]
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखले जातात. त्यांच्या या बिनधास्त स्वभावाचा अनुभव यावेळी साताऱ्यातील विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाला. मुलं छेड काढत असल्याची तक्रार एका मुलीने केली आणि उदयनराजेंनी दिलेलं उत्तर ऐकून सर्व मुलांनी टाळ्या आणि शिट्टी वाजवून त्याला दाद दिली.
उदयनराजे भोसले प्रचाराच्या निमित्ताने वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन युवक-युवतींशी संवाद साधत आहेत. त्याच संवादावेळी काही मुलं-मुली आपल्या अडचणी आपल्या लाडक्या राजाला सांगत आहेत. एका मुलीने महाराजांकडे मुले छेड काढत असल्याची तक्रार केली. यावर राजेंनी मुलं मुलींकडेच बघतात, मात्र अशा पद्धतीची विकृती जर दिसून आली तर मला याविषयी जरुर कळवा, मी यामध्ये लक्ष घालून संबधित व्यक्तीला जरुर विचारणा करेन, असं उत्तर त्यांनी दिलं.
पाहा व्हिडीओ
VIDEO : मुलींकडे नाही मग मुलं मुलांकडेच बघणार का? तक्रार सांगणाऱ्या मुलींना राजेंचं उत्तर pic.twitter.com/RPxsR4BzcW
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2019