सातारा: भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhonsle) आणि सातारा जावलीचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhonsle) यांच्यात सातारा नगरपालिका निवडणुकीच्या (Satara Municipal Council Election) पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांचा सामना चांगलाच रंगलाय. शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला उदयनराजे भोसले यांच्याकडूनही सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना चर्चेला येण्याचे आव्हान दिलं. तर, यावेळी यावेळी खासदार उदयनराजेंनी व्यासपीठावर “काय बाई सांगू? कसं ग सांगू मलाच माझी वाटे लाज” हे गाणे गायले.. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. कार्यक्रमादरम्यान उदयनराजे भोसले भावनिक झाल्याचंही पाहायला मिळालं.
शिवेंद्रराजे भोसले यांनी काही दिवसांपुर्वी उदयनराजे भोसलेंवर टीका केली होती या मध्ये उदयनराजे भोसले यांच्याकडून साताऱ्यात करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या उद्घाटनावर टीका करत गँग म्हणजे नारळफोड्या गँग असा उल्लेख केला होता. खासदार उदयनराजे भोसलेंनी यावरून शिवेंद्रराजे भोसलेंना जोरदार फटकारलं. आम्ही नारळ वाढवून लोकांची चांगली कामं करतो. मात्र, तुम्ही तर लोकांची घरच फोडायचं काम केल्याची टीका करत शिवेंद्रराजेंना जबरदस्त उत्तर दिलंय.
सातारा नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी खासदार उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना चर्चेला येण्याचे आव्हान दिलं. आम्हाला नारळफोडी गँग असा उल्लेख केला असला तरी आम्ही कामे केली म्हणून नारळ फोडतो. एखाद्याच संपूर्ण घरदार उध्वस्त केलं नाही, असे सांगत चर्चेला यायचं असेल तर उदयनराजे कधीही तयार आहेत. मात्र, धाडस पाहिजे, असे प्रतिआव्हान त्यांनी दिले आहे. कारण नसताना लहान मुलांसारखी वैयक्तिक टीका आमदार शिवेंद्रराजे यांच्याकडून सुरू आहे.. यावेळी खासदार उदयनराजेंनी व्यासपीठावर “काय बाई सांगू? कसं ग सांगू मलाच माझी वाटे लाज” हे गाणे गायले.. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
सातारा नगर पालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आज खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.. यावेळी बोलताना खासदार उदयनराजे भावनिक झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले.. यावेळी सातारकरांना ‘ऑलवेज देअर फॉर यु’ म्हणत माझ्यावर जीव लावणाऱ्यांची मी कशी परतफेड करू असे म्हणताच उदयनराजेंना अश्रू अनावर झाले..
Goa Elections 2022: गोव्यात आप आणि तृणमूल एकत्र लढणार का? वाचा काय म्हणाले केजरीवाल
Udayanrje Bhonsle slam Shivendraraje Bhonlse via song kay bai sangu over Satara Municipal Council Election