उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांचे टेन्शन वाढवणारी बातमी; वकील महिलेचा गंभीर आरोप
या आरोपांप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल दाखल करण्यात आली आहे.
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांवर बेकायदेशीर मालमत्ता जमवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल दाखल करण्यात आली आहे. गौरी भिडे नावाच्या वकिल महिलेने ही याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ता गौरी भिडे यांनी स्वत: या प्रकरणी युक्तिवाद केला. यामुळे कोर्ट कार्यालयाने यावर आक्षेप घेतला आहे.
याचिकाकर्त्या यांना आधी सर्व आक्षेप दूर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. या याचिकेवरील सुनावणी 2 आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे .
सन 2019 पासून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पब्लिक डोमेनवर काही गोष्टी आढळल्या आहेत. त्यावरून मी याचिका दाखल केल्याचा यु्क्तीवाद गौरी भिडे यांनी केला आहे.
या संदर्भात मी अनेक वकिलांची भेट घेतली. पण कुणी हवा तसा प्रतिसाद दिला नाही. यामुळे मी स्वत:च याचिकेवर युक्तिवाद करत असल्याचे गौरी भिडे म्हणाल्या.
या संदर्भात मी 11 जुलै 2022 रोजी तक्रार केली होती. यांनतर 26 जुलै 2022 रोजी पुन्हा रिमांयडर तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी काहीही दखल न घेतल्याने मी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहेय
ठाकरेचं का? असा सवाल कोर्टाने गौरी भिडे यांना विचारला. इतरही असतील पण आता सुरूवात झाली आहे. अन्य जणही पुढे येतील. माझा तक्रारीवर तपास व्हावा हीच माझी इच्छा आहे अस याचिकाकर्ता गौरी भिडे यांनी सांगितले.