वसई विरारमधील गुंडगिरी हद्दपार करा, फादरवाडीत उद्धव ठाकरेंची गर्जना

पालघर: वसई विरारमधील गुंडगिरी हद्दपार करा, असं थेट आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पालघर लोकसभा मतदारसंघातून केला. उद्धव ठाकरे यांनी नायगाव बापाणे इथं पहिला रोडशो केला. तिथंच शिवसैनिक महिलांनी त्यांचं आरती ओवाळून स्वागत केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी छोटी चौक सभा घेतली. शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित […]

वसई विरारमधील गुंडगिरी हद्दपार करा, फादरवाडीत उद्धव ठाकरेंची गर्जना
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

पालघर: वसई विरारमधील गुंडगिरी हद्दपार करा, असं थेट आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पालघर लोकसभा मतदारसंघातून केला.

उद्धव ठाकरे यांनी नायगाव बापाणे इथं पहिला रोडशो केला. तिथंच शिवसैनिक महिलांनी त्यांचं आरती ओवाळून स्वागत केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी छोटी चौक सभा घेतली. शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित यांना निवडून आणा आणि महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी  केलं.

गुंडगिरी हद्दपार करा याशिवाय उद्धव ठाकरे यांनी वसईतील फादरवाडी इथंही कोपरा सभा घेतली. युतीचा आणि महायुतीचा धर्म पाळून रेकॉर्डब्रेक मतदान करा, वसई विरारमधील गुंडगिरी हद्दपार करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

वसई-विरार गुंडगिरीबद्दल मी येणाऱ्या जाहीर सभेत बोलणार आहे, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचं वर्चस्व आहे. त्यावरुनच उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला.

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी वसईतल्या गुरुद्वारामध्ये दर्शन घेत, वसईतल्या शीख समुदायाशी संवाद साधला आणि युतीला मतदान करण्याचं आवाहन केलं.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पालघर लोकसभा मतदार संघाच्या प्रचार दौऱ्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (प्रकल्प)एकनाथ शिंदे,शिवसेना आमदार रवींद्र फाटक आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण उपस्थित राहिले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.