मुंबई : एकीकडे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार शेवटच्या घटका मोजत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. त्यात औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचा आहे. शिवसेनेकडून औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं (Osmanabad) नाव धाराशिव करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नामांतराचा प्रस्ताव ठेवण्यात येईल अशी माहिती कालच परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली होती. त्यानंतर आज अखेर या दोन्ही शहराच्या नामांतराला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलीय.
शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी कालच शिवसेनेकडून तीन महत्वाचे प्रस्ताव उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं. औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशिव करा अशी शिवसेनेची मागणी आहे. मात्र, मागील अडीच वर्षापासून सत्तेत असूनही शिवसेनेकडून याबाबत कुठलीही हालचाल झाली नव्हती. मात्र, आता शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शिवसेनेनं हे महत्वाचे प्रस्ताव सादर केले गेले. तसंच नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव देण्याचाही एक प्रस्ताव शिवसेनेकडून मांडला गेला. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला काँग्रेस जोरदार विरोध करण्याची शक्यता वर्तवली जात होती.
होय संभाजीनगरच! pic.twitter.com/fbv9ZUBa31
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) June 29, 2022