Shiv Sena : शिवसेनेच्या बैठकीला 23 पैकी फक्त 12 खासदार हजर, इतर खासदारांचे काय?; शिवसेनेचं टेन्शन वाढलं?
Shiv Sena : उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली खासदारांची बैठक विशेष आहे. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा यावर फैसला होणार आहे. शिवसेना सध्या यूपीएसोबत आहे. यूपीएने यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उभं केलं आहे.
मुंबई: शिवसेनेत (shivsena) झालेलं आमदारांचं बंड आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या (president election) पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांची आज मातोश्रीवर बैठक सुरू झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी ही बैठक बोलावली आहे. मात्र या बैठकीला शिवसेनेच्या 23 पैकी 12 खासदारचं उपस्थित आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. यापूर्वीच शिंदे गटाच्या संपर्कात शिवसेनेचे 12 खासदार असल्याची चर्चा होती. त्यातच आजच्या बैठकीला केवळ 12 खासदार हजर राहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. आजच्या बैठकीत या गैरहजर खासदारांवरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कुणाला मतदान करायचं यावरही चर्चा होणार असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे हे खासदारांच्या कलाने जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेही या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेचे एकूण 19 खासदार आहेत. तर राज्यसभेत चार खासदार आहेत. मात्र, आजच्या बैठकीला 19 पैकी 10 खासदारच उपस्थित राहिले आहेत. तसेच राज्यसभेतील चार खासदारांपैकी केवळ दोनच खासदार उपस्थित आहेत. शिवसेनेच्या खासदारांच्या बैठकीला नेहमीच सर्व खासदार उपस्थित राहतात. मात्र, पहिल्यांदाच या बैठकीला खासदारांनी दांडी मारली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर आणि खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर हे खासदार गैरहजर राहिल्याने चर्चांना अधिक उधाण आलं आहे. गैर हजर असलेल्या काही खासदारांनी तर भाजपला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. त्यामुळेही या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
बैठकीत काय निर्णय होणार?
उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली खासदारांची बैठक विशेष आहे. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा यावर फैसला होणार आहे. शिवसेना सध्या यूपीएसोबत आहे. यूपीएने यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उभं केलं आहे. तर भाजपने द्रोपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी शिवसेनेच्या काही खासदारांची मागणी आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्धव ठाकरेंना यांना पत्रं लिहून तशी मागणीही केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहावे लागणार आहे.
लोकसभेतील उपस्थित खासदार
धर्येशील माने अरविंद सावंत विनायक राऊत श्रीरंग बारणे हेमंत गोडसे राहुल शेवाळे गजानन किर्तीकर सदाशिव लोखंडे ओमराजे निंबाळकर प्रतापराव देशमुख
राज्यसभेतील उपस्थित खासदार
प्रियंका चतुर्वेदी संजय राऊत
राज्यसभेतील गैरहजर खासदार
अनिल देसाई (दिल्लीत आहेत)
गैरहजर खासदार
राजेंद्र गावित भावना गवळी रामदास तडस श्रीकांत शिंदे राजन विचारे (मातोश्रीकडे निघाल्याचं वृत्त आहे)