Uddhav Thackeray : मुख्यमंत्री ठाकरे RT-PCR टेस्टमध्ये निगेटीव्ह, अँटिजनमध्ये पॉझिटीव्ह, टेस्टींगमध्ये झोल की राजकारणात?

मुख्यमंत्री ठाकरे RT-PCR टेस्टमध्ये निगेटीव्ह. तर नेतेमंडळी वेगळंच म्हणतात.

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री ठाकरे RT-PCR टेस्टमध्ये निगेटीव्ह, अँटिजनमध्ये पॉझिटीव्ह, टेस्टींगमध्ये झोल की राजकारणात?
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्रीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 1:32 PM

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे राजकारणात कोरोनाचा (Corona) शिरकाव झाल्याचं दिसतंय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यातच आता एक माहिती समोर आली असून ख्यमंत्री ठाकरे RT-PCR टेस्टमध्ये निगेटीव्ह तर अँटिजनमध्ये पॉझिटीव्ह आल्याची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे यांच्या कोरोनासंदर्भातील बतमीवर संशय निर्माण झाल्याचं बोललं जातंय. आधीच महाविकास सरकार अडचणीत आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. यामुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालाय. आता यावर पुन्हा कोणता नेता काय बोलतो, याकडे लक्ष लागून आहे.

वेगवेगळी माहिती आणि गोंधळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्यासंदर्भात वेगवेगळी वक्तव्य समोर येतायत. विजय वडेट्टीवार म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली नाही. तर कमलनाथ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याचं म्हटलंय. यामुळे कोरोनातही राज्यकर्त्यांचा झोल असल्याची चर्चा सध्या आहे. कारण, एकच माहिती वेगवेगळी कशी दिली जाते, असा देखील सवाल करण्यात येतोय.

हे सुद्धा वाचा

राज्यपालांना कोरोनाची लागण

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोना सदृष्य लक्षणं दिसू लागल्यानं त्यांनी कोरोना चाचणी केली. रिलाईन्स हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रासह मुंबईत गेल्या काही दिवसांपासून एकीकडे कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय वारेही वेगानं वाहू लागलेत. या सगळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भूमिका महत्त्वाची ठरते. त्यातच एकनाथ शिंदे हे दुपारी राज्यपालांची भेट घेणार होते. दुपारी घेण्यात येणाऱ्या या भेटीदरम्यान, महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील, अशी शक्यता होती. पण त्याआधीच मोठी घडामोड समोर आली असून आता एकनाथ शिंदे मुंबईला जाणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.