Uddhav Thackeray : ‘आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!’ एकनाथ शिंदेंना अखेर उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिंदे आणि फडणवीसांना शुभेच्छा दिल्यात. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगलं काम होवो, ही सदिच्छा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवरुन शिंदे आणि फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!' एकनाथ शिंदेंना अखेर उद्धव ठाकरेंच्या शुभेच्छा
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 10:08 PM

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी शिंदे आणि फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहे. आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही शिंदे आणि फडणवीसांना शुभेच्छा दिल्यात. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगलं काम होवो, ही सदिच्छा, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवरुन शिंदे आणि फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.

शरद पवारांचा एकनाथ शिंदेंशी संवाद

आज एकनाथ शिंदे यांच्यावर जी जबाबदारी पडली. त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं. त्यांना शुभेच्छा दिल्या. अपेक्षा अशी आहे की एकदा राज्याचा प्रमुख झाल्यावर तो राज्याचा होतो. तो कोणत्या पक्षाचा प्रतिनिधी असेल. पण शपथ घेतल्यावर तो राज्याचा प्रतिनिधी होतो. राज्याचा प्रमुख होतो. राज्यातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडून कामगिरी व्हावी ही अपेक्षा आहे मी त्यांना बोलून दाखवली. त्यासाठी त्यांना अंतकरणापासून शुभेच्छा दिल्या, असं शरद पवार यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदींकडून मराठीत शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खास मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत.

 

पक्षाचा आदेश शिरोधार्य – फडणवीस

‘एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पद दिले, त्या पक्षाचा आदेश मला शिरोधार्य आहे’, असं ट्वीट करत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सहभागी झाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.