“हिंदुत्वाचा बुरखा घालून देशावर घाव घालणार असाल, तर खपवून घेणार नाही”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. जर भाजप हिंदुत्वाचा बुरखा घालून देशावर घाव घालणार असेल, तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला दिला (Uddhav Thackeray on Hindutv CAB and NRC).

हिंदुत्वाचा बुरखा घालून देशावर घाव घालणार असाल, तर खपवून घेणार नाही
Follow us
| Updated on: Dec 16, 2019 | 9:07 PM

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. जर भाजप हिंदुत्वाचा बुरखा घालून देशावर घाव घालणार असेल, तर ते खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपला दिला (Uddhav Thackeray on Hindutv CAB and NRC). पाकिस्तान आणि इतर मुस्लीम देशांमधील हिंदूंची काळजी दाखवतात, मग बेळगावमधील हिंदूंवर भाषिक अत्याचार होत असताना काय केलं? कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार आहे. त्यांनी काय पावलं उचलली? असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला (Uddhav Thackeray on Hindutv CAB and NRC). ते नागपूर येथे बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मुख्यमंत्रिपद मोठं आहे, त्यामुळे त्याची आव्हानं देखील मोठी आहेत. असं असलं तरी शिवसेना नेहमी मोठी आवाहनच घेते. हे आव्हान स्वीकारलं नसतं तर शिवसेना प्रमुखांचा पुत्र म्हणून ते माझ्यासाठी योग्य ठरलं नसतं.”

नागपूर येथे जमलेल्या जनतेच्या उपस्थितीचं चित्र ताकत देणारं आहे. मी दिवसभराची कामं करुन कुटुंब प्रमुख म्हणून तुमच्या समोर आलो आहे. मी तुमच्याकडे आधीही आलो आहे आणि यानंतर देखील येणार आहे, असंही ठाकरे यांनी नमूद केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी याच नागपुरात कर्जमुक्तीसाठी मेळावा घेतला होता. त्यावेळी देता की जाता असा सवाल केला होता. आपण विदर्भात खूप कामं आपण केली. आता सत्ता मिळाल्यावर आपल्या सरकाराने जुन्या सरकारसारखं वागलं तर मला चालणार नाही. सत्तेत जनतेसाठी आलो. म्हणूनच सत्तेत नम्रतापूर्वक राहून जनतेची कामं करायची आहेत.”

आम्ही आधीही हिंदुत्ववादी होतो आणि उद्याही राहणार आहोत. सरकारमध्ये येताच आम्ही धर्म परिवर्तन केलेलं नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

नागरिकत्व कायद्यावर शिवसेनेची भूमिका काय?

नागरिकत्व कायद्यावर शिवसेनेची भूमिका काय असा तुम्हाला प्रश्न पडत असेल. शिवसेना तळ्यात-मळ्यात असं वाटत असेल. मात्र, तसं अजिाबत काहीही नाही. आम्ही आमचं काम करतो. आम्ही दिलेला शब्द पाळतो. आमच्या प्रश्नाला हे उत्तर का देत नाही? बाहेरून येणारे हिंदू आहेत त्यांना घ्या, पण मग कर्नाटकसारख्या भागात आमचे मराठी भाऊ आहेत. त्यांच्यावर भाषिक अन्याय होतो आहे. त्यांच्याबाबत निर्णय का घेत नाही? असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.