पुढच्या वेळेला त्यांचा पक्ष पेपर वाचण्यापुरता राहावा : उद्धव ठाकरे

राज ठाकरे सध्या विरोधी पक्षाची मागणी करत आहेत, त्याबाबत तुमची प्रतिक्रिया काय असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray on Raj Thackeray) यांना विचारण्यात आलं.

पुढच्या वेळेला त्यांचा पक्ष पेपर वाचण्यापुरता राहावा : उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 12, 2019 | 12:00 PM

मुंबई : विधानसभा  निवडणुकीसाठी शिवसेनेने आपला वचननामा (shiv sena manifesto 2019) आज जाहीर केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल देसाई यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत वचननामा प्रकाशित (shiv sena manifesto 2019) करण्यात आला.  यादरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांना उत्तरं दिली.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray on Raj Thackeray) यांना साहजिकच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारसभांबाबत विचारण्यात आलं. राज ठाकरे सध्या विरोधी पक्षाची मागणी करत आहेत, त्याबाबत तुमची प्रतिक्रिया काय असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray on Raj Thackeray) यांना विचारण्यात आलं. त्यावर पुढच्या वेळेला त्यांचा पक्ष पेपर वाचण्यापुरता रहावा, अशी तिरकस प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

नारायण राणेंवर भाष्य

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांना नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावरही विचारण्यात आलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कटुता संपवण्याचे आवाहन त्यांना ( राणेंना) केलं आहे, मला नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपला राणेविरोध कायम असल्याचं दाखवलं.

युतीच्या संयुक्त वचननाम्याबाबत

मुख्यमंत्री आणि आम्ही बसून बोललो नाहीत, पण फोनवर चर्चा झाली तेव्हा आम्ही अनेक मुद्यांवर बरोबर आहोत. त्यांचेही आमच्यापेक्षा काही वेगळे मुद्दे असू शकतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईच्या वचननाम्यात आरेचा मुद्दा

आरेचा उल्लेख हा मुंबईच्या वचननाम्यात आहे. आरे बद्दलची भूमिका सेनेने मांडली आहे. आमचा विरोध आहेच, सर्व पक्षांच्या नेत्यांना उभं करा मग चर्चा करु.  आरेचा मुद्दा जितका संवेदनशील आहे, तितकाच गंभीरही आहे. माझं सर्व राजकीय पक्षांना आवाहन आहे त्यांनी एका व्यासपीठावर यावं आणि आपापली भूमिका जनतेपुढे मांडावी. शिवसेनेने याआधी भूमिका मांडली आहे. त्या व्यसपीठावरही शिवसेना भूमिका मांडेल, असं उद्धव यांनी नमूद केलं.

शिवसेनेच्या वचननाम्यातील काही महत्वाचे मुद्दे

  • आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना मोफत महाविद्यालयीन शिक्षण
  • प्रत्येक जिल्ह्यात बचतगट उभारणार
  • सर्व शासकीय शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणार

 शेतकऱ्यांसाठी

  • शेतीखालील क्षेत्रवाढीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यात 10 हजार प्रतिवर्षी जमा करणार
  • कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार
  • शेत तिथे ठिबक सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 3 वर्षाकारिता 95 टक्के अनुदान देणार
  • शेतीमधील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आवश्यक घटकांच्या किमती पुढील 5 वर्षे स्थिर ठेवणार

शैक्षणिक सुविधा

  • तालुका स्तरावर गाव ते शाळा-महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांसाठी 2500 विशेष बसची सुविधा
  • शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शिक्षण आणि स्वयंरोजगार प्राप्तीसाठी शून्य टक्के कर्ज योजना राबवणार
  • मध्यान भोजन योजनेला दर्जामुक्त करणार

शहर विकास

  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शहर सडक योजना अंमलात आणणार
  • ज्या राज्यात शहरांतर्गत बससेवा नाही अशा शहरात एसटीच्यावतीने इलेक्ट्रिक बस सुरू करणार
  • अ आणि ब गट नागरपालिकांमध्ये पादचारी मार्ग निर्मितीसाठी अर्थसंकल्पत तरतूद

वीज निर्मिती आणि दर कपात

  • 300 युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर 30 टक्क्यांनी कमी करणार
  • शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन प्राप्त व्हावे याकरिता पडीक जमिनीवर सौर ऊर्जा निर्मिती

आरोग्य सुविधा

  • सर्व जिल्ह्यांमध्ये एक वैद्यकीय महाविद्यालय
  • 1 रुपी क्लिनिक, शिव आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य चाचणी
  • दुर्गम भागात मिनी मोबाईल आरोग्य केंद्र
  • सागरी किनारपट्टीचा विस्तार लक्षात घेऊन बोट अम्ब्युलन्स
  • जिल्हा रुग्णालयात स्त्रियांसाठी कर्करोगाची चाचणी

अन्न हे पूर्णब्रह्म

राज्यात 1 हजार ठिकाणी स्वस्त आणि सकस जेवणाची केंद्रे

स्वछता पर्यवरण

  • 5 वर्षात इलेक्ट्रीकल वाहन धोरण गतिमान व्यापक करणार
  • गावातील नद्या, नाले, विहिरी, तळे यामधील प्रदूषण टाळण्यास एसटीपी योजना राबवणार
  • मुंबईसह कोकण खड्यांमधील कांदळवन संरक्षण राबवणार

उद्योग आणि रोजगार

  • राज्य शासनातील सरकारी नोकरीतील सर्व रिक्त पदे भरणार
  • स्थानिकांना 80 टक्के आरक्षित
  • मुंबई शहर पर्यटन केंद्र व्हावे म्हणून अनिवासी क्षेत्रात सर्व सोयी सुविधा देणार

गृहनिर्माण

  • पंतप्रधान आवास योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री आवास योजना
  • अभय योजनेअंतर्गत मुंबई, ठाण्यातील भक्कम स्वरुपातील अनियमित बांधकामे नियमित करणार
  • मुंबईतील म्हाड्याच्या 56 वसाहतींचा विकास, जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी 6 महिन्यात गृहनिर्माण धोरण अमलात आणणार
  • भाडेकरूंचे हक्क अबाधित ठेवण्यासाठी रेरा कायदाअंतर्गत सुरक्षित करणार
  • मुंबई-ठाणे कोकण कोळीवाडे गावठाणात स्वयं विकासाची परवानगी देणार
  • एसआरए योजनाऐवजी मुंबई अभय योजना

मराठी भाषा

  • मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते निर्माण करणार
  • मराठीचे पुरातन दस्तावेज ऐतिसाहिक संस्कृतीचे देवाण घेवाण करण्यासाठी मराठी विद्यापीठ निर्माण करणार

गृह विभाग

  • यापुढे पोलीस भरतीमध्ये पूर्वीप्रमाणे प्रथम मैदानी मग लेखी परीक्षा
  • पोलीस आणि जवानांच्या मुलांना प्राधान्य
  • राज्य राखीव पोलीस दलात कर्मचारी जिल्हा पोलीस सेवेमध्ये असलेली 15 वर्षे अट बदलून 10 वर्षे करणार

पर्यटन, कला आणि संस्कृती

  • राज्यातील सर्व गावांमधील पारंपरिक धार्मिक स्थळांना अनुदान देणार
  • कोकणात जागतिक पर्यटनाला चालना मिळणासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी विमानतळ कार्यान्वित करणार

सामाजिक न्याय

धनगर, बंजारा, कोळी, लिंगायत, ओबीसी, भटके, विमुक्त अशा आणि इतर  समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवणार

संबंधित बातम्या  

मला माझा आवाका माहिताय, उंटाचा मुका घेणार नाही, सत्ता नको, विरोधी पक्षाची संधी द्या : राज ठाकरे  

UNCUT SPEECH | मला विरोधी पक्षनेतेपद द्या, गोरेगावमधील राज ठाकरेंचं संपूर्ण भाषण  

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.